Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

विद्यापीठाच्या परीक्षा केंद्रांना भेटी देवून कुलगुरूंकडून पाहणी

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या उन्हाळी पदवी अभ्यासक्रमाच्या परीक्षा शुक्रवार ५ एप्रिल पासुन सुरळीत सुरु झाल्या. कुलगुरू प्रा. व्ही.एल. माहेश्वरी यांनी पहिल्या दिवशी जळगाव शहरातील तीन महाविद्यालयांमधील परीक्षा केंद्रांना भेटी देवून पाहणी केली.

पदवी (बी.ए., बी.कॉम., बी.एस्सी., बी.एस.डब्ल्यू.) अभ्यासक्रमाच्या परीक्षा सुरु झाल्या आहेत. तीनही जिल्हयातील विविध महाविद्यालयांच्या परीक्षा केंद्रावर या परीक्षा सुरु झाल्या असून पहिल्या दिवशी सर्व परीक्षा सुरळीत झाल्याची माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक प्रा. योगेश पाटील यांनी दिली. शुक्रवारी कुलगुरू प्रा. व्ही.एल. माहेश्वरी यांनी जळगाव शहरातील बाहेती महाविद्यालय, नुतन मराठा महाविद्यालय आणि बेंडाळे महिला महाविद्यालय येथील परीक्षा केंद्रांना अकस्मात भेटी देवून पाहणी केली. या सर्व केंद्रावर परीक्षा सुरळीत सुरु होत्या. यावर्षी प्रथमच परीक्षा केंद्रांवरील वर्गावर मोठ्या आकाराचे पोस्टर लावण्यात आले असून त्यावर परीक्षा गैरप्रकारासाठी कोणत्या प्रकारची शिक्षा होवू शकते याची माहिती देण्यात आली आहे.

Exit mobile version