Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

महिला वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून उध्दटपणाची वागणूक; रूग्णांमध्ये कमालीची नाराजी !

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल ग्रामीण रूग्णालयात कायमस्वरूपी वैद्यकीय अधिकारी नसल्याने व तात्पूरत्या स्वरूपात आलटून पालटून येणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांमुळे आरोग्य सेवेचे तिन तेरा वाजले आहे. यातच आता एका महिला वैद्यकीय अधिकारी यांच्या रुग्णांशी उद्धटपणाच्या वागणुकीमुळे आरोग्य प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जात आहे. यामुळे रूग्णांमध्ये प्रचंड नाराजी व्यक्त केली जात आहे.

यावल शहर हा आदिवासी क्षेत्रातील तालुक्यातील प्रमुख शहर म्हणुन ओळखले जाते. याठिकाणी ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी रूग्णांची मोठी गर्दी असते. परंतू असतांना यावल ग्रामीण रुग्णालयाला मागील २ वर्षापासुन कायमस्वरूपी वैद्यकीय अधिकारीपदाची ४ पदे ही रिक्त असल्याने तातपुरत्या स्वरूपात वैद्यकीय सेवा बजावणाऱ्या डॉक्टरांकडून रुग्णांचे अर्धवट उपचार होत आहे. भुसावळ येथून येणाऱ्या एक महिला वैद्यकीय अधिकारी यांची रुग्णांशी अत्यंत निंदनीय व उद्धटपणाची वागणुक देत असल्याने रुग्णांमध्ये त्यांच्या कार्यपध्दीतीबद्दल प्रचंड नाराजी रूग्णांमध्ये व त्यांच्या नातेवाईकांमध्ये व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान लोकप्रतिनिधी यांनी प्रसिध्दी लाटण्यासाठी ग्रामीण रुग्णालयात वारंवार आरोग्य शिबीर घेण्याएवजी यावल ग्रामीण रूग्णालयात मागील दोन वर्षापासुन रिक्त असलेल्या वैद्यकीय अधिकारींची पदे भरल्यास अशा प्रकारे शिबीरांचे प्रसिद्धीसाठी गोंधळ घालण्याची गरज पडणार नाही अशी संत्पत प्रतिक्रिया रूग्णांमध्ये व त्यांच्या नातेवाईकांमध्ये व्यक्त करण्यात येत आहे .

Exit mobile version