Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

वर्षा राऊत ईडीच्या कार्यालयात हजर : पत्राचाळ प्रकरणी होणार चौकशी

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | पत्रचाळ घोटाळा प्रकरणी संजय राऊत यांच्या सौभाग्यवती वर्षा राऊत हा सक्तवसुली संचलनालय म्हणजेच ईडीच्या कार्यालयात हजर झाल्या आहेत.

पत्रा चाळ घोटाळा प्रकरणात शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते तथा राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांना अटक करण्यात आली असून त्यांना ८ ऑगस्टपर्यंत ईडीची कोठडी मिळालेली आहे. याच प्रकरणात त्यांची पत्नी वर्षा राऊत यांचा देखील सहभाग असल्याचा संशय ईडीला असून या अनुषंगाने त्यांना चौकशीसाठी नोटीस बजावण्यात आलेली आहे. यासाठी त्या आज ईडीच्या कार्यालयात उपस्थित झाल्या आहेत.

पत्राचाळ प्रकरणात वर्षा राऊत यांच्या खात्यावरील व्यवहार उघडकीस आल्यानंतर त्यांना ईडीने हे समन्स बजावले आहे. वर्षा राऊत यांना ईडीने समन्स बजावल्यामुळे आता त्यांना ईडी समोर हजर राहून त्यांची बाजू मांडावी लागणार आहे. या अनुषंगाने त्यांची आज ईडी चौकशी करणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Exit mobile version