Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

एसआयटी चौकशी करा ; अन्यथा बेमुदत धरणे आंदोलन

चाळीसगाव प्रतिनिधी । शेतकरी बचाव कृती समितीच्या शिष्ठमंडळांनी शेतकऱ्यासह नुकतीच महसूल मंत्री थोरात व पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची मंत्रालयात भेट घेऊन येत्या २१ सप्टेंबर रोजीच्या आत एसआयटी चौकशीला सुरुवात करावी, अन्यथा बेमुदत धरणे अंदोलन करण्यात येईल, असा इशारा निवेदनावेळी देण्यात आला आहे.

पालमंत्र्यांनी  महसूलमत्रींना एसआयटी चौकशीच्या मागणीचे पत्र लिहले, तसेच दुसर्या  दिवशी मंत्री मंडळाच्या कॅबिनेट बैठकीत विषय मांडतो असे अश्वासन देऊन गंभीर दखल घेतली आहे. तसेच महसुल मंत्री थोरात यांना देखील त्यांच्या शासकीय निवास्थानी प्रत्यक्ष भेटून निवेदन देण्यात आले आहे. 

दरम्यान त्यांनी आपल्यावर अंदोलनाची वेळ येऊ देणार नाही. कोरोनामुळे या प्रकरणी एसआयटी चौकशी नेमण्यास थोड उशिर झाल्याचे महसुलमंत्र्यांनी सांगितले. त्यानंतर शेतकरी बचाव कृती समितीने बेकायदेशीर गैरव्हार बाबत व प्रकल्पात जमिनी गेलेल्या शेतकर्यांवर झालेल्या अन्याया विषयी मुंबई येथे पत्रकार परिषद घेतली. 

या प्रसंगी समितीचे कार्यध्यक्ष व स्वत: पिडीत असलेले किशोर सोनवणे यांनी कायदेशीर /बेकायदेशीर बाबी समजावून सांगितल्या, अध्यक्ष अॅ, भरत चव्हाण ,जेष्ठ मार्गदर्शक काशिनाथ माऊली ,प्राणी मित्र ईंदल चव्हाण अदिंनी  शेतकर्यांची झालेली फसवणूक प्रकल्पाच्या मालकांनी घेतलेली गावगुंडाची मदत याबद्दल माहीती दिली.

या प्रसंगी उपस्थित स्वप्रेरणेणे समितीशी जुडलेले सेवाभावी जेष्ठ कांतिलाल राठोड,  बंजारा क्रांती दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष राकेशभाऊ जाधव कृती समातीचे सचिव भिमराव जाधव व पिडीत शेतकर्यांपैकी, रमेश चव्हाण, खुशाल राठोड, सुभाष वंजारी, मदन राठोड, समाधान साबळे, सोमनाथ राठोड, रामंचंद्र राठोड, आरूण जाधव व काही शेतकरी उपस्थित होते. 

तत्पूर्वी या आंदोलनाबाबत मुख्यमंत्री, उद्योगमंत्री,उर्जामंत्री, पर्यावरमंत्री, अदि मंत्री यांच्या मंत्रालयातील कार्यालयात जाऊन निवेदने देण्यात आली. आझाद मैदान पोलीस स्टेशनसह, जिल्हाधिकारी जळगाव, जिल्हा पोलीस निरीक्षक व आमदार मंगेश चव्हाण यांना देखील निवेदन देण्यात आले आहे.

Exit mobile version