Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

रस्ता काँक्रिटीकरण व गटारीच्या कामांची चौकशी करा; राष्ट्रवादीची मागणी

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  अत्यंत वाहनांच्या वर्दळीच्या यावल भुसावळ मार्गावर सद्या काँक्रीटीकरणाचा रस्ता व गटारीच्या बांधकाम सुरू असुन या कामावर संबंधीत ठेकेदार करून निविदा अटींचा भंग करून मातीमिश्रीत वाळू आणि कमी प्रमाणात सिमेंट वापरण्यात येत आहे.

कामाच्या गुणवत्तेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले असुन संबधीत विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्वरीत या कामाची चौकशी करून ठेकेदारावर कारवाई करावी, अशी तक्रार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष प्रा . मुकेश येवले यांनी यावल सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केली आहे.

यावलच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यक्षेत्रातील अवजड वाहनांसह दळण वळणाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या असलेल्या यावल ते भुसावळ मार्गावरील जुना भुसावळ नाक्यापासुन तर नाल्यापर्यंतच्या गटारी बांधकाम व रस्त्याचे काँक्रीटीकरणाचे काम सुरू आहे. सदरच्या या कामावर काम करणाऱ्या ठेकेदाराकडून शासकीय निविदा व अटीशर्ती धाब्यावर ठेवुन अत्यंत कमी प्रमाणात सिमेंट व नाल्याची माती मिश्रीत वाळुचा वापर करण्यात येवु सदरचा निकृष्ठ प्रतिचा बनविता जात आहे .

या मार्गावर नेहमीच परप्रांतातुन येणारी अवजड वाहनासह इतर येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांच्या रहदारीचा असुन वाहतुकीची मोठी वर्दळ या मार्गावरील रस्त्यावर असते त्यामुळे निकृष्ठ प्रतिचे साहित्य वापरून तयार होणारा हा काँक्रीटचा रस्ता फार काळ टिकणार नाही. त्याचप्रमाणे संबधीत ठेकेदाराकडून सदरचे काम हे कासवगतीने करण्यात असल्याने भुसावळकडे जाणाऱ्या ईतर वाहनांचा मार्ग हा दुसरीकडे वळविण्यात आल्याने वाहनधारकांना त्याचा मोठा त्रास सोसावे लागत आहे.

संबधीत विभागाने सदरील या कामाची त्वरीत या कामाची चौकशी करून शासकीय नियम धाब्यावर ठेवुन काम करणाऱ्या ठेकेदारावर योग्य कारवाई करावी, कारवाई न झाल्यास राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने तिव्रआंदोलन करण्यात येणार असल्याचा ईशारा दिला असुन प्रसंगी न्यायालयात देखील दाद मागण्यात येईल असे ही प्रा मुकेश येवले यांनी यावलच्या सार्वजनिक बांधकाम विभागास दिलेल्या निवेदनात म्हटले आहे .

Exit mobile version