Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

हातनुर कॅनल ते चोपडा या कामाची चौकशी करा – मनसेची मागणी

यावल – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी |  हातनुर कॅनल ते चोपडा या कामाची गुणवत्ता व चौकशी करण्यात यावी अशी मागणी जळगांव जिल्हा संघटक मनसे चेतन दिलीप अढळकर यांनी अधीक्षक अभियंता लाभक्षेत्र प्राधिकरण जळगाव यांना निवेदनाद्वारे केली आहे.

 

 

निवेदनाचा आशय असा की,  यावल तालुक्यातील पाटबंधारे या विभागाकडून पाटाच्या उजव्या साईटची बाजूची झाडे झुडपे व काटेरी झाडे काढण्याचे काम चालू होते.  ते काम चालु असतांना त्या ठिकाणी नित्कृष्ठ प्रतिचे काम निदर्शनास आले.  यावेळी  संपुर्ण पाहणी केली असता रस्ता दुरूस्ती व जागो जागी नित्कृष्ठ काम दिसत गेले.  संबंधित ठेकेदाराने हे काम केवळ बिले काढण्यासाठी घाई गडबडीत केल्याचे दिसून येते. तरी झालेल्या कामाचे बिल संबंधित ठेकेदाराचे बिले काढण्यात येऊ नये. कारण कोणतीही निविदा प्रक्रिया न करता ठेकेदार नेमणे हे कायदेशीर असून विशेष जवळच्या ठेकेदारास नेमणूक करून बिले काढण्याचा प्रकार हा पाटबंधारे विभागाच्या कार्यालयाने या कामाबाबत योग ते लक्ष देण्याची गरज होती. मात्र तसे न झाल्याने या कामाचा भ्रष्टाचार झाल्याने पाहण्यास मिळत आहे. तरी आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून मागणी करतो की, या सर्व प्रकाराची सखोल चौकशी कामी आपण योग्य ती कार्यवाही करण्यात यावी व भ्रष्ट अधिकारी कर्मचारी यांना कर्तव्यात कसूर केल्यामुळे व कामाची पाहणी न करता निविदा न काढता एका जवळच्या व्यक्तीला काम दिल्याबद्दल यांना निलंबित करण्यात यावे व त्यात आर्थिक गैरव्यवहार झाला असून अधिकारी जे कोणी दोषी असतील त्याची शुध्द चौकशी करण्यात यावी व या संपूर्ण कामाची पाहणी आपण करून घ्यावी तसे न झाल्यास मनसे जन आंदोलन किंवा आमरण उपोषण करेल याची आपण नोंद घ्यावी. निवेदनावर उपजिल्हा संघटक अजय तायडे, यावल तालुकाध्यक्ष किशोर नन्नवरे, यावल उप तालुकाध्यक्ष संतोष जवरे यांची स्वाक्षरी आहे.

 

Exit mobile version