Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

दुचाकीला इनोव्हाची धडक : दोघे जिवलग मित्र ठार

जामनेर – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । दोघे जिवलग मित्र पहूरकडे जात असतांना सुनसगाव फाट्याजवळ समोरुन येणाऱ्या इनोव्हा गाडीने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने दोघं जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, जीवन शिवाजी कोळी (वय 25) विकास संजय पाटील (वय 27) दोघे माळपिंपरी येथे राहणारे असून मृत व्यक्तीचे नाव आहे. बुधवार रात्रीच्या सुमारास सुनसगाव फाट्याजवळ गाडीने जबर धडक दिल्यामुळे दोघांचा अपघातात जागीच मृत्यू झाला. या घटनेत एक जण गंभीर जखमी झाला आहे. त्याला जळगाव उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. जीवन कोळी व विकास पाटील दोघे जिवलग मित्र होते.  सुखा-दुखात सोबत राहणारे होते. या घटनेची माहिती मिळताच आरोग्यदूत जालम सिंग राजपूत, तुकाराम निकम, नाना भोजने, कमलाकर पाटील आदी कार्यकर्त्यांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन मदत केली.

 

Exit mobile version