Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

रेल्वेतून पडल्याने जखमी तरूणाचा मृत्यू; ओळख पटविण्याचे आवाहन

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर रेल्वे स्थानकाजवळ धावत्या मेमो रेल्वेतून पडल्याने अनोळखी तरूण गंभीर जखमी झाला होता. त्याला लोहमार्ग पोलीसांनी पुढील उपचारासाठी धुळे शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, उपचारादरम्यान त्या तरूणाचा मृत्यू झाला असून मयताची ओळख पटविण्याचे आवाहन लोहमार्ग पोलीसांनी केले आहे.

 

जी.आर.पी पोलीसांनी दिलेल्या माहितीवरून अमळनेर रेल्वे स्थानकावर २९ ऑगस्ट रोजी रात्री ११ वाजता मेमो एक्सप्रेस मधून एका तरुण इसम पडल्याने जखमी झाला असता घटनेची माहिती लोहमार्ग पोलिसांना मिळताच घटनास्थळी पोलिसांनी धाव घेत तपासणी केली असता सदरील तरुण/ पुरुष अनोळखी असल्याचे समजले. याबाबत जखमी तरुणाला उपचारासाठी धुळे शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले होते. दरम्यान त्या तरूणाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला असून मयताची ओळख पटविण्याचे आवाहन अमळनेर लोहमार्ग पोलिसांनी केले आहे.

 

(संपर्क साधावा 9923050831) मृत व्यक्तीचे वर्णने- अंदाजीत वय २५ ते ३० वर्ष, रंग गोरा, उंची ५×५, केस काळे, बारीक दाढी- मिशा, हातांवर चार ठिकाणीं गोंधन काढलेले तसेच अंगावर पांढरा शर्ट काळ्या रंगाचे फुले व काळी जिन्स असे वर्णन असून पुढील घटनेचा तपास पोलीस कॉन्स्टेबल अलका अढाळे करीत आहे.

Exit mobile version