Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

दुचाकी स्लीप झाल्याने जखमी तरूणाचा मृत्यू

भुसावळ शहर पोलीसात गुन्हा दाखल

भुसावळ -लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | शहरातील नहाटा कॉलेजजवळ दुचाकी चालवित असतांना महामार्गावर दुचाकी स्लीप झाल्याने तरूण गंभीररित्या जखमी झाल्याची घटना २१ जानेवारी रोजी सकाळी ७ वाजता घडली होती. खासगी रूग्णालयात उपचार सुरू असतांना तरूणाचा शुक्रवारी २ फेब्रुवारी रोजी दुपारी ३ वाजता मृत्यू झाला. याप्रकरणी भुसावळ शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नेांद करण्यात आली आहे. अभिषेक राजेश शर्मा वय २४ रा. नहाटा कॉलेज, भुसावळ असे मयत झालेल्या तरूणाचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, अभिषेक राजेश शर्मा हा तरूण आपल्या कुटुंबासह वास्तव्याला होता. २१ डिसेंबररोजी सकाळी ७ वाजता अभिषेक शर्मा हा दुचाकी घेवून शहरात जात असतांना नहाटा कॉलेज जवळील महामार्गावर दुचाकी अचानक स्लिप झाली. या अपघातात अभिषेक गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने खासगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते
त्याच्यावर उपचार सुरू असतांना त्यांचा मृत्यू झाला. शुक्रवारी २ फेब्रुवारी रोजी दुपारी ३ वाजता मृत्यू झाला. याप्रकरणी भुसावळ शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नेांद करण्यात आली आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार मोहम्मद अली सैय्यद हे करीत आहे.

Exit mobile version