Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

अज्ञात वाहनाच्या धडकेतील जखमी बिबट्याचा अखेर मृत्यू

चाळीसगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी । तालुक्यातील पिलखोड शिवारात अज्ञात वाहनाच्या धडकेत जखमी झालेल्या बिबट्याचा आज अखेर मृत्यू झाला आहे. बिलाखेड येथील वनात शासकीय इतमात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, तालुक्यातील पिलखोड शिवारातील चाळीसगाव – मालेगाव रस्त्यावर अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या गंभीर जखमी झाल्याची धक्कादायक घटना २७ जानेवारी रोजी रात्री ८:३० (वेळ निश्चित नाही) वाजेच्या सुमारास घडली होती. या घटनेची माहिती मिळताच चाळीसगाव वनपरिक्षेत्र अधिकारी शीतल नगराळे ह्या आपल्या सहकाऱ्यांसह तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. व जखमी बिबट्याला औषधोपचारासाठी जेरबंद करण्याचा प्रयत्न केला. मात्र जखमी बिबट्याने कर्मचाऱ्यांवर हल्ला चढवण्याचा प्रयत्न केला. यात वनविभागाची सहा तास शर्यत सुरू होती. परंतु त्यांच्या प्रयत्नांना अपयश आले. व आज रात्री ३ वाजताच्या सुमारास एका शेतकऱ्याच्या मक्याच्या शेतात बिबट्या अखेर मृत अवस्थेत आढळून आला. त्यावर बिबट्याचे बिलाखेड येथील राखीव वनात शवविच्छेदन पूर्ण करून शासकीय इतमात अंत्यसंस्कार करण्यात आले.

सदर कार्यवाही विवेक होशिंग, उपवनसंरक्षक जळगाव, सुदर्शन शिसव व सहा. वनसंरक्षक जळगाव यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी शितल नगराळे चाळीसगाव, मानद वन्यजीव रक्षक विवेक देसाई, राजेश ठोंबरे, जि. एस. पिंजारी, आर. व्ही. चौरे, जाधव, एस. बी. चव्हाण, वाय. के. देशमुख, के. बी. पवार, आर. आर. पाटील, आर. बी. पवार, सी. व्ही. पाटील एम. पी. शिंदे, एस. एच. जाधव, ए. एन. महिरे, अमित पाटील, एस. एच. जाधव, बाळू शितोळे, भटू अहिरे, श्रीराम राजपूत, दिनेश कुळकर्णी, राहुल मांडोळे, समाधान मराठे यांच्यासह सहायक पोलीस निरीक्षक विष्णू आव्हाड व पोलीस कर्मचाऱ्यांनी केली.

Exit mobile version