Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

नेहरू युवा केंद्राचा उपक्रम, अभिनव शाळेतील विद्यार्थ्यांनी घेतले योगाचे धडे!

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । केंद्र शासनाचा उपक्रम असलेल्या नेहरू युवा केंद्र जळगावतर्फे मंगळवारी माहेश्वरी विद्या प्रसारक संस्थेच्या अभिनव प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिनाचा कार्यक्रम घेण्यात आला.

संपूर्ण जगात आज आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा केला जातो. केंद्र शासनाचा उपक्रम असलेल्या नेहरू युवा केंद्र जळगावतर्फे माहेश्वरी विद्या प्रसारक संस्थेच्या अभिनव विद्यालयात साजरा करण्यात आला. योग शिक्षकांनी विद्यार्थ्यांना योगाचे धडे दिले. योगा दिनाचा उपक्रम नेहरू युवा केंद्राचे युवा अधिकारी नरेंद्र डागर यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आला.

सकाळी विद्यार्थ्यांची प्रभात फेरी काढून योगाबाबत जनजागृती करण्यात आली. योगशिक्षक जितेंद्र कोतवाल यांनी विद्यार्थ्यांना योगाचे धडे दिले. प्रसंगी अभिनव शाळेचे मुख्याध्यापक हेमंत पाटील, मुख्याध्यापिका सरोज तिवारी, नेहरू युवा केंद्राच्या स्वयंसेविका हेतल पाटील आदी उपस्थित होते. उपक्रमात ५ वी ते १० वीच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला.

योगशिक्षक जितेंद्र कोतवाल यांनी विद्यार्थ्यांना योगाचे महत्व पटवून देत आजच्या दिवसाचे महत्व सांगितले. मुख्याध्यापक हेमंत पाटील व सरोज तिवारी यांनी देखील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. योगाचे विविध प्रकार विद्यार्थ्यांनी समजून घेतले. उपक्रमासाठी विद्यालयातील शिक्षक साधना कोल्हे, वैशाली पाटील, नयना मोरे, दीप्ती नारखेडे, प्रेमसिंग चव्हाण, साजन तडवी, उज्ज्वला पवार, शिल्पा रौतोळे, वर्षा गवळी, पंकज पाटील, अश्विनी साळुंखे, ज्योती पाटील, संतोष सपकाळे, गुरु बारेला शिक्षकेतर कर्मचारी देविदास चौधरी, भूषण पाठक, लताबाई माळी, अमिना तडवी आदींनी सहभाग नोंदवित परिश्रम घेतले.

 

Exit mobile version