Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

अनुसुचित जमातीच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाच्या निवासी शाळांमध्ये प्रवेशाकरीता प्रक्रीया सुरु

जळगाव प्रतिनिधी । अनुसुचित जमातीच्या विद्यार्थ्यांना शहरातील नामांकीत इंग्रजी माध्यमाच्या निवासी शाळांमध्ये इयत्ता 1 ली व 2 रीच्या वर्गात प्रवेशित होणाऱ्या विद्यार्थ्यांना सन 2021-22 या शैक्षणिक वर्षात प्रवेश देण्याची योजना आदिवासी विकास विभागामार्फत राबविण्यात येत आहे. 

या योजनेचा लाभ घेऊ इच्छिणारा विद्यार्थी अनुसूचित जमातीचा असावा, विद्यार्थ्याच्या किंवा पालकांचे नांवे सक्षम अधिकाऱ्याने दिलेल्या अनुसूचित जमातीच्या दाखल्याची साक्षांकीत प्रत सादर करावी, दारिद्र्य रेषेखालील असल्यास यादीतील अनुक्रमांक नमुद असलेला ग्रामसेवकाचा दाखला, पालकाच्या कुटूंबाची वार्षिक उत्पन्नाची कमाल मर्यादा  रु. 1.00 लाख या मर्यादेत असावी.

इयत्ता 1 ली साठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्याचे वय 30 सप्टेबर, 2021 रोजी 6 वर्षे पूर्ण असावे, त्याचा जन्म 1 ऑक्टोबर, 2014 ते 30 सप्टेंबर, 2015 दरम्यान झालेला असावा. इयत्ता 2 री च्या वर्गात प्रवेशासाठी सदर विद्यार्थी सन 2020-21 या शैक्षणिक वर्षामध्ये इयत्ता 1 ली मध्ये शाळेत प्रवेशित असल्याबाबतचे बोनाफाईड अर्जासोबत जोडावे, विद्यार्थ्यांचे आधारकार्ड आवश्यक आहे. तसेच विद्यार्थ्याचे वैद्यकीय प्रमाणपत्र, विद्यार्थ्याचे पालक शासकीय/निमशासकीय नोकरदार नसावेत.

या योजनेतंर्गत ज्या पालकांनी आपल्या पाल्यास इंग्रजी माध्यमाच्या निवासी शाळेत इयत्ता 1 ली च्या वर्गात प्रवेश घ्यावयाचा आहे. त्यांनी प्रवेश अर्जासाठी प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, यावल, जि. जळगाव येथे प्रत्यक्ष पाल्याचा जन्मदाखला व आधारकार्ड सांक्षाकित प्रत सादर केल्यानंतर प्रवेश अर्ज विनामुल्य 5 मार्च, 2021 पर्यंत वाटप केले जाणार आहे. परीपूर्ण अर्ज भरुन दिनांक 10 मार्च, 2021 पूर्वी अर्ज सादर करावा.

इयत्ता 1 ली व इयत्ता, 2 री च्या प्रवेशासाठी कागदपत्र पडताळणीसाठी चोपडा, अंमळनेर, एरंडोल, धरणगाव, जळगाव तालुक्यातील पालकांनी व पाल्यांनी दिनांक 15 मार्च, 2021 रोजी बालमोहन विद्यालय, चोपडा, शिव कॉलनी, शिरपुर रोड, चोपडा येथे मर रावेर, यावल, मुक्ताईनगर, जामनेर, बोदवड, भुसावळ, चाळीसगाव, पाचोरा, भडगाव तालुक्यामधील पालकांनी व पाल्यांनी दिनांक 15 मार्च, 2021 रोजी शासकीय आश्रमशाळा, डोगरकठोरा, ता. यावल येथे उपस्थित रहावे. असे आवाहन प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, यावल यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

Exit mobile version