प्रहार जनशक्ती संघटनेतर्फे निर्जंतुकीकरणास प्रारंभ

जामनेर प्रतिनिधी । शहरात आणि तालुक्यात प्रहार जनशक्ती संघटनेने मोठ्या प्रमाणात सेवा कार्य करण्यास प्रारंभ केला आहे. याचा एक भाग म्हणून शहरात कोरोनाचे वाढते रुग्ण पाहता अन् हॉटस्पॉट ठरू नये, तसेच नागरिकांचे आरोग्य सुदृढ राहावे यासाठी पुढाकार घेऊन निर्जंतुकीकरणाचे कार्य सुरु केले. जामनेर नगर परिषदेचे मुख्याधिकारी राहुल पाटील यांनी ट्रॅक्टर टँकर पुरविल्याने निर्जंतुकीकरणाच्या कामाला वेग आला आहे.

जामनेर पुरा परिसरातून निर्जंतुकीकरण आला प्रारंभ करण्यात आला .प्रहार जनशक्ती संघटनेचे नेते प्रदीप गायके ,मनोज महाले यांच्या नेतृत्वाखाली निर्जंतुकीकरण कार्य मोठ्या प्रमाणात सुरु आहे. संपूर्ण शहरात पाच-सहा दिवसात हे कार्य पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती प्रहार जनशक्ती संघटनेने दिली. याकामी  प्रफुल्ल  लोढा यांच्या सौजन्याने निर्जंतुकीकरणाला गती मिळाली आहे. जामनेर शहराचे आरोग्य राखणे आपली प्राथमिक जबाबदारी असल्याची माहिती प्रहार जनशक्ती संघटनेने दिली.  ग्रामीण भागात सुद्धा अशाच प्रकारचे कार्य तातडीने हाती घेण्यात येणार आहे.

याकामी मनोज बोरसे, राहुल भोलाने, दिपक खाटीक, गोलू खाटीक, सचिन बोरसे, गणेश बोरसे, मनोज धनगर, ईश्वर राजपूत, दत्तदास बैरागी, भूषण धनगर,आकाश बंडे, अविनाश बोरसे यांचे सहकार्य मिळत आहे.

 

Protected Content