Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

एका दिवसात वारसास पेन्शन लागू

 

भुसावळ, प्रतिनिधी । कैलास सीताराम ट्रॅकमन यांचे कोरोनामुळे दिनांक २८ रोजी दुर्दैवी निधन झाले. यानंतर लगेच २ सप्टेंबर रोजी त्यांच्या वारसांना कार्मिक विभागाच्या वतीने सर्व पीएफ व इतर रक्कम प्रदान करत पेन्शन लागू करण्यात आली.

ट्रॅकमन कैलास सीताराम यांचे कोरोनामुळे दिनांक २८ रोजी निधन झाले. त्यांचे मृत्यूपत्र आणि इतर आवश्यक कागदपत्रे दिनांक २ सप्टेंबरला कार्मिक विभागाला प्राप्त झाली. त्याच दिवशी एका दिवसात त्यांच्या वरासदराला कार्मिक विभागाच्या वतीने सर्व पीएफ आणि इतर रक्कम प्रदान करण्यात आली.

एवढेच नाहीतर त्याच दिवसापासून पेंशन देखील लागू करण्यात आली. हे सर्व काम अतीशय तत्परतेने आणि कार्यकुशलता पूर्वक श्रीकांत सूर्यवंशी कल्याण निरीक्षक यांनी. तसेच कार्मिक आणि लेखा विभागातील सर्व कर्मचाऱ्यांचे सहकार्य मिळाले. एन. डी. गांगुर्डे, सिनि डीपीओ यांचे मार्गदर्शनाखाली कार्मिक शाखेच्या कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Exit mobile version