Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

चावडी कार्यालयातर्फे शेतकऱ्यांना ई-पीक पाहणी ॲपची माहिती

यावल प्रतिनिधी । महसूल विभागाने पीक पाहणीसाठी ई-पीक पाहणी संदर्भात तात्काळ माहिती उपलब्ध व्हावी, या स्वतंत्र मोबाइल अप्लिकेशनची निर्मिती करण्यात आली असून यावल शहरातील चावडी कार्यालयातर्फे ई-पिक पेरणी पाहणी अॅपची माहीती देवुन ॲपला परिसरातील शेतकरी बांधवांना जोडण्यात येत आहे.

उपक्रमाच्या पार्श्वभुमीवर आता शेतकरी बांधवांना आपल्या शेती शिवारातील पिकपेरणीची माहीती सहज मराठी भाषेत एका क्लिकवर पिकेपेरीणीची माहीती उपलब्ध होणार असुन , राज्यासह जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील गावात तलाठी कार्यालयावर याबाबत शेतकरी बांधवांना अॅपची माहीती देण्यात येत आहे. दरम्यान महाराष्ट्र राज्यात सर्वत्र शेतकरी यांचे सक्षमीकरण व्हावे त्यांना नविन तंत्रज्ञानाशी जोडुन मुख्य प्रवाहात आणण्याचा महाराष्ट्र शासनाचा प्रयत्न असुन , शेतकरी बांधवांसाठीची एक उत्कृष्ठअसे मार्गदर्शन व आपल्या पिक पेरणीची सविस्तर माहीती देणाऱ्या ई पिकपेरणी अॅप्स हे दिनांक १५ ऑगस्ट या स्वातंत्रदिनी यावल तहसील कार्यालयात तहसील महेश पवार , निवासी नायब तहसीलदार आर के पवार, नायब तहसीलदार आर डी पाटील वआदी मान्यवरांच्या उपस्थितीत  या ऑनलाईन पिकपेरणी पाहणी अॅप्स माहीतीचे संकेत देणाऱ्या नवीन  तंत्रज्ञानाची सुरुवात करण्यात आली असुन यावेळी परसाडे येथील तलाठी समीर तडवी यांनी ई – पिक पाहणी प्रकल्पाचे शेतकऱ्यांना होणारे फायदे या संदर्भात माहीती देतांना सांगितले की तलाठी यांच्या कामाचा व्याप कमी करण्यास मदत होणार तसेच या ई – पिक पाहणीमुळे गावनिहाय वस्तुस्थिती दर्शक व सत्यस्थिती दर्शक माहीती ( Real Time Corp Data )संकलित करण्यासाठी उपयुक्त ठरणार , तलाठी यांना गांव नमुना नंबर १९ ( जिन्नसवार पेरपत्रक ) तयार करण्यास मदत , शिक्षण कर , रोजगार हमी कर नोंदवह्या तयार करण्यास मदत, नैसर्गिक आपत्तीमुळे पिंकाचे नुकसान झाल्यास भरपाई आणी योग्य प्रकारच्या मदतीसाठी ही फायदेशिर राहणार आहेत त्याचबरोबर आधारभुत शासकीय खरेदी केन्द्रावर शेतमाल विक्री सुलभीकरण साठी उपयुक्त , कृषी पतपुरवठा सक्षमीकरणा साठी मदत , त्याचबरोबर राज्याचे मुख्यमंत्री यांनी घोषणा केलेले पिकेल ते विकेल या योजनेसाठी ही ई- पिक पाहणी अॅप्स फायदेशीर असणार आहे अशी माहीती मार्गदर्शनाव्दारे उपस्थित नागरीकांना दिली .यावल तलाठी कार्यालयावर शेतकरी बांधवांना तलाठी ईश्वर कोळी यांनी शहरातील चावडी कार्यालयात या आपल्या परिसरात ई पिक पेरणी पाहणी अॅप्सची माहीती देवुन त्यांना या अॅप्स शी परिसरातील शेतकरी बांधवांना जोडत आहे .

 

Exit mobile version