महागाईचा उडाला भडका – गाठला दराचा उच्चांक   

दिल्ली वृत्तसंस्था | देशात सातत्याने होत असलेल्या इंधनाच्या दरवाढीसोबतच अन्न-धान्य आणि खाद्य महागाईच्या दरातही वाढ झाल्याचे चित्र पहायला मिळत असून २०१४ पासून आतापर्यंतच्या आठ वर्षात यंदा रेकोर्ड तोडत उच्चांक गाठला आहे.

येत्या २६ मे २०२२ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी पंतप्रधान पदाची आठ वर्षे पूर्ण करत असताना खाद्यतेल, भाजीपाला महागला असून याच्या दरात वाढ झाल्याचं पहायला मिळत आहे.  खाद्यपदार्थ महागाईचा दर मार्चमध्ये ७.६८ टक्के इतका होता एप्रिलमध्ये त्यात वाढ होऊन तो ८.३८ टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे; तर भाजीपाला मध्ये दरवाढ होऊन मार्चमध्ये ११.६४ असलेला दर एप्रिल महिन्यात १४.४१ टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. शहरीभागात ७.०१ टक्के तर ग्रामीण भागातील तर ८.०४ टक्के इतका महागाईचा दर आहे.

मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळाच्या सुरुवातीला म्हणजेच मे २०१४ पासून कच्च्या तेलाच्या किमती जशा होत्या अजूनही तशाच आहेत. मात्र तरीही मोदी सरकारच्या काळात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती ७२ टक्क्यांपर्यंत वाढल्या असून पेट्रोल आणि डिझेलवर आकारण्यात येणाऱ्या उत्पादन शुल्कातही ५३० टक्क्यांनी वाढ झाल्याचे समोर येत असल्याने या दरम्यान गेल्या ३ वर्षांत केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील करातून सुमारे ८.०२ लाख कोटी रुपये कमावत कमावले आहेत.

रिझर्व्ह बँकेनं ६ टक्के मर्यादा निश्चित केली आहे. मात्र गेल्या चार महिन्यात झालेली महागाईची ही विक्रमी वाढ घालून दिलेल्या कमाल मर्यादेपेक्षाही अधिक असल्याने सर्वसामान्यांच्या खिशाला न परवडणारी अशी आहे.

Protected Content