Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

महाबळेश्वर येथे गोदावरी व्यवस्थापन महाविद्यालयाची औद्योगिक भेट

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी ।  गोदावरी फाऊंडेशन संचलित गोदावरी इन्स्टिट्युट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (MBA) महाविद्यालयाची तीन दिवसीय औद्योगिक भेट महाबळेश्वर येथे पार पडली.

सर्वप्रथम टूरची सुरवात अलिबाग समुद्रकिनारा पासून झाली नंतर कोकण आणि महाबलेश्वर येथे गेली. यावेळी मॅप्रो या प्रसिद्ध कंपनीला भेट देण्यात आली. विद्यार्थ्यांनी या  कंपनीमधील खाकरा बनवण्याची पध्दत जसे पीठ कसे मिक्स केले जाते त्यानंतर मशीनच्य साहाय्याने खाकरा बनवला जातो flavor mix करून पॅकिंग कसे केले जाते इत्यादी पद्धत बघितली, आइसक्रीम बनवण्याची पद्धत, ब्रेड बनविण्याची पद्धत व इतर उत्पादन पद्धती यावेळी विद्यार्थ्यांनी बघितली. या भेटीचा उद्देश विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञानाबरोबरच औद्योगिक कार्यप्रणाली कशी चालते, उत्पादन कसे केले जाते, व्यवहार कसे होतात, मार्केटिंग कशी केली जाते, सेल्स प्रमोशन techniques कशा प्रकारे वारापल्या जातात इत्यादी बाबी विद्यार्थ्यांना समजाव्यात तसेच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा असा होता. ह्या औद्योगिक भेटीस MBA च्या प्रथम व द्वितीय वार्षामधील विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. सदर औद्योगिक भेटीचे कामकाज महाविद्यालयाचे प्रा.प्राजक्ता पाटील यांनी बघितले.

Exit mobile version