Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

इंदूरीकर महारांनी सांगितला कोरोनावरील एकमेव उपाय !

नाशिक प्रतिनिधी | एकीकडे देशभरात प्रचंड प्रमाणात लसीकरण होत असतांना ख्यातनाम कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदूरीकर यांनी आपण लस घेतली नसून यावरील उपाय देखील सांगितला आहे.

नाशिक जिल्ह्यातील आपल्या कीर्तनात केलेल्या वक्तव्यामुळे इंदूरीकर महाराज चर्चेत आले आहेत. नाशिक जिल्ह्यातील घोटी येथील एका कार्यक्रमात केले आहे. गोपाळरावजी गुळवे यांच्या ८१व्या जयंतीनिमित्ताने घोटी कृषी उत्पन बाजार समितीत शेतकरी मेळावा आणि इंदुरीकर महाराज यांच्या किर्तनाचे आयोजन करण्यात आले होते.

यात ते म्हणाले की, प्रत्येकाची रोग प्रतिकारक शक्ती वेगवेगळी आहे. प्रत्येकाच्या मेंदूची क्षणता वेगवेगळी आहे. मी तर अजून लस घेतली नाही आणि घेणारही नाही. काही होतच नाही तर घेऊन काय करायचं. कोरोनावर एकच औषध आहे, मन खंबीर ठेवा. एकीकडे सरकार देशभरात लसीकरण मोहीम राबवत आहे. कोट्यवधी लोकांनी लस घेतली आहे. पण, समाज प्रबोधनाचे धडे देणर्‍या कीर्तनकारानेच कीर्तनातून लस घेतली नाही आणि घेणार नाही.

इंदुरीकर महाराज काही महिन्यांपूर्वी पुत्र प्राप्तीवरुन केलेल्या वक्तव्यामुळे चर्तेत आले होते. या प्रकरणी त्यांच्या विरोधात तक्रार देखील दाखल करण्यात आली होती. यातच आता कोरोना लसीकरणावरुन पु्न्हा एकदा ते चर्चेत आले आहेत.

Exit mobile version