Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

भारताचा चमू बनला अंडर-१९ क्रिकेट विश्‍वविजेता

अँटिग्वा- वृत्तसेवा | अंडर १९ वर्ल्डकप स्पर्धेत टीम इंडियाने इंग्लंडला धुळ चारून विश्‍वविजेतेपद पटकावले. राज बावा याच्या याच्या अष्टपैलू खेळीमुळे भारतीय चमूने पाचव्यांदा विश्‍वचषकावर नाव कोरले.

अँटिग्वाच्या सर व्हिव्हियन रिचर्ड्स स्टेडियमवर रंगलेल्या अंडर १९ विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताने इंग्लंडला ४ गड्यांनी धूळ चारली इंग्लंडने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र भारताच्या रवी कुमार आणि राज बावा यांनी केलेल्या तिखट मार्‍यासमोर इंग्लंडचा संघ १८९ धावांत आटोपला. इंग्लंडकडून जेम्स रियूने ९५ धावांची झुंज दिली. तर बावाने ५ बळी घेत इंग्लंडच्या डावाला सुरूंग लावला. प्रत्युत्तरात भारताने आपले सहा फलंदाज गमावले, पण उपकर्णधार शेख रशीद आणि निशांत सिंधूच्या अर्धशतकांच्या जोरावर भारताने विजय मिळवला. यश धुलच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने या स्पर्धेत उत्कृष्ट खेळ दाखवला होता. त्यांनी स्पर्धेत आतापर्यंत खेळलेले सर्व सामने जिंकले. राज बावाला सामनावीर पुरस्कार मिळाला. तर दक्षिण आफ्रिकेच्या डेवाल्ड ब्रेविसला मालिकावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. . भारत पाचव्यांदा अंडर १९ विश्वविजेता ठरला आहे.

भारताने उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाचा पराभव केला तर इंग्लंडने अफगाणिस्तानचा पराभव करून अंतिम फेरी गाठली. चार वेळा चॅम्पियन टीम इंडिया विजेतेपदासाठी प्रबळ दावेदार होता. त्याचबरोबर इंग्लंडनेही २४ वर्षांनंतर अंतिम फेरीत स्थान मिळवून भारताला सावध केले होते. यश धुल हा दिल्लीकर असून त्याच्याकडून पुन्हा एकदा विजेतेपदाची अपेक्षा केली जात होती. आणि त्याने निराशा न करत विश्‍वविजेतेपद पटकावून दिले.

Exit mobile version