Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

ग्लोबल इकोनॉमिक फ्रीडम इंडेक्समध्ये भारत २६ वरुन १०५ व्या नंबरवर

 

नवी दिल्ली- जागतिक आर्थिक स्वातंत्र्य निर्देशांकात (ग्लोबल इकोनॉमिक फ्रीडम इंडेक्स) भारत २६ व्या स्थानावरून तब्बल १०५ व्या स्थानापर्यंत घसरला आहे.

कॅनडाच्या फ्रेजर इन्स्टिट्यूटने भारतातील सेंटर फॉर सिव्हिल सोसायटीच्या सहकार्याने हा अहवाल तयार केला आहे. वर्ष २०१९ मध्ये भारत या यादीत ७९ व्या क्रमांकावर होता. जागतिक आर्थिक स्वातंत्र्य निर्देशांकात हाँगकाँग आणि सिंगापूर क्रमश: पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकावर आहेत. चीन या यादीत १२४ व्या स्थानी आहे. पहिल्या १० देशात जे देश सामील आहेत त्यात न्यूझीलंड, स्वित्झर्लंड, ऑस्ट्रेलिया, अमेरिका, मॉरीशस, जॉर्जिया, कॅनडा आणि आयर्लंड यांचा समावेश आहे.

अन्य प्रमुख देशांमध्ये जपान २० व्या क्रमांकावर असून जर्मनी २१ व्या, इटली ५१व्या, फ्रान्स ५८ व्या, रशिया ८९ व्या क्रमांकावर आहे. सर्वांत तळात असलेल्या देशांमध्ये प्रामुख्याने आफ्रिकन देश आहेत. तळात असलेल्या देशात कांगो, झिम्बाब्वे, अल्जेरिया, इराण, व्हेनेझुएला यांचा समावेश आहे.

Exit mobile version