Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

भारताचा दणदणीत विजय : पाकला चारली धुळ

दुबई-वृत्तसंस्था | हार्दीक पांड्या आणि रवींद्र जडेजाच्या चमकदार खेळीमुळे भारताने पाकला पाच गड्यांनी पराभूत करून विश्‍वचषकातील पराजयाचा बदला घेतला.

पाकिस्तानची सुरूवात अडखळत झाली. मोहम्मद रिझवान आणि बाबर ही जोडी लवकरच फुटली. तिसर्‍या षटकात बाबर आझम (१०) झेलबाद झाला. त्यानंतर संघाच्या ४२ धावा झालेल्या असताना फकर झमन (१०) आवेश खानच्या चेंडूवर झेलबाद झाला. त्यानंतर इफ्तिखार अहमद आणि मोहम्मद रिझवान या जोडीने सावधगिरीने आगेकूच केली. मात्र अहमद २८ धावा करून हार्दिक पंड्याच्या चेंडूवर झेलबाद झाला. त्यानतर मोहम्मद रिझवान ४३ धावांवर असताना हार्दिक पंड्याने त्याला बाद केलं. त्यानंतर मात्र पाकचा एकही फलंदाज चांगली कामगिरी करू शकला नाही. यामुळे भारताला १४८ धावांचे लक्ष्य मिळाले.

दरम्यान, यानंतर भारतालाही सुरवातीलाच धक्का बसला. पहिल्याच षटकात राहुल शून्यावर बाद झाला. यानंर विराट कोहली-रोहित शर्मा या जोडीने ४९ धावांची भागिदारी केली. मात्र रोहित शर्मा (१२) विराटने खेळाची सूत्रे हाती घेतली. तथापि, ३५ धावा केल्या. मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केल्यामुळे मोहम्मद नवाझने टाकलेल्या चेंडूवर तो झेलबाद झाला. पुढे रविंद्र जडेजा आणि सूर्यकुमार यादव या जोडीने ३६ धावांची भागिदारी केली.सूर्यकुमार यादवने १८ चेंडूमध्ये १८ धावा केल्या. त्यानंतर रविंद्र जाडेजा (३५) आणि हार्दिक पांड्या यांनी भारताचा विजय साकार केला. हार्दिक पांड्याने भारताला 3 चेंडूत 6 धावांची गरज असताना षटकार मारून सामना जिंकून दिला.

सामन्याचा हिरो हार्दिक पांड्या ठरला. त्याने भेदक मारा करत 3 विकेट घेतल्या तर फलंदाजीत 17 चेंडूत नाबाद 33 धावांची सामना जिंकून देणारी खेळी केली. यानंतर दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये एकच जल्लोष सुरू झाला. यातून भारताने विश्‍वचषक स्पर्धेतील पराजयाचा बदला घेतला.

Exit mobile version