Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

अपक्ष आमदार चंद्रकांत पाटील मुंबईला रवाना

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  मुक्ताईनगर येथील अपक्ष आमदार चंद्रकांत पाटील हे मुंबईवरून फोन आल्यानंतर ते तातडीने मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. ते देखील नॉटरिचेबल झाले आहेत.

 

आमदार चंद्रकांत पाटील यांच्या मुलाची तब्बेत बिघडल्याने कालच मुंबईहून मुक्ताईनगर येथे आले होते. दरम्यान, आ.चंद्रकांत पाटील यांना नेमका फोन कुणाचा आला. ते एकनाथ शिंदे गटात कडे गेले की मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे गेले याबाबत कोणतीही माहिती मिळू शकली नाही.

 

शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या पक्षातील ४० आमदारांना घेवून कालपासून सुरत येथे रवाना झाले होते. ४० आमदारांना घेवून आपला वेगळा संसार मांडण्याच्या तयारीत आहे. कालपासून राज्यातील राजकीय वर्तूळात भूकंपाचे हादरे बसत आहे. शिवसेने भाजप सोबत येवून सरकार स्थापन करावी अशी मागणी एकनाथ शिंदे यांनी केली आहे. या मागणीमुळे महाविकास आघाडीचे सरकार कोसळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यात आज सकाळी एकनाथ शिंदे यांनी गुवाहटी येथील रॅडिसन हॉटेल पोहचले आहे. दरम्यान, आपल्या सोबत ४० आमदार असल्याचा दावा एकनाथ शिंदे यांनी केला आहे. दरम्यान, राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील हे देखील नॉटरिचेबल असून ते देखील गुवाहटीकडे रवाना झाल्याची माहिती टिव्ही नाईन या वृत्तवाहिनीने प्रसिध्द केले आहे. त्यातच आता आमदार चंद्रकांत पाटील हे देखील मुंबईकडे रवाना झाले असून ते देखील सकाळपासून नॉटरिचेबल झाले आहेत.

Exit mobile version