Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

अपक्ष उमेदवार प्रभाकर सोनवणे यांची गरताड, कोळाबा, कुरवेल परिसरात प्रचार रॅली

prabhakar sonwane

 

चोपडा प्रतिनिधी । चोपडा विधानसभा मतदार संघातील अपक्ष उमेदवार प्रभाकर सोनवणे यांची आज (दि.17) गरताड, कोळाबा, कुरवेल या परिसरात प्रचार रॅली काढण्यात आली.

अपक्ष उमेदवार प्रभाकर आप्पा सोनवणे यांनी प्रचारात मुसंडी मारली आहे. प्रत्येक परिसरातून माहिलांकडून सोनवणे यांचे औक्षण करण्यात येत असून अनेक महिलावर्गातून गरताड, कोळबा, कठोरा या परिसरातील महिला मतदारांनी काही रोख रक्कम प्रभाकर आप्पांना दिले. गरताड येथील नबा पाटील या महिलेने प्रभाकर आप्पा सोनवणे यांना रोख रक्कम देत आमच्या कडून हा खारीचा वाटा घ्या, प्रभूरामचंद्रांनाही रावणाची लंका उद्धवस्त व सितामातेला परत आण्यासाठी समुद्रात सेतू बांधायचा होता. तेव्हा खारुताईने प्रभू रामचंद्रना मदत केली होती. त्याच पध्दतीने आमची छोटीशी मदत घ्या, आपण निवडून यावे, यासाठी ही मदत आहे. ती सार्थक व्हावी म्हणून ती मदत आपल्याच देत आहे असे ही नबाबाई भावलाल पाटील यांनी आप्पांना सांगितले. यावेळी उपस्थित मंडळीला देखील आश्चर्य वाटले तद्नंतर गरताड, कोळाबा, कुरवेल येथून ही अनेक महिलांनी रक्कम देऊन औक्षण केले.

यावेळी चोपड्याचे माजी आमदार कैलास पाटील, पंचायत समितीचे सभापती आत्माराम म्हाळके, माजी जि.प.सदस्य शांताराम सपकाळे,
ए.डी.चौधरी, तुकाराम पाटील, प्रकाश रजाळे, देवाबापू पाटील, सुभाष पाटील, देवेंद्र सोनवणे, गजेंद्र सोनवणे, सुनंदा पाटील, मनोहर पाटील, भिवराज रायसिंगे, रोहिदास अहिरे, पांडुरंग सोनवणे, हिम्मतसिंग पाटील, लक्ष्मण पाटील, पद्माकर चौधरी, हिम्मत पाटील, मंगल पाटील, प्रकाश पाटील, नवल पाटील, रामकृष्ण पाटील, अजय पाटील, मिलिंद पाटील, योगेश्वर पाटील, नरेंद्र पाटील, राहुल पाटील, निळकंठ पाटील, प्रदीप पाटील, गौरव पाटील, डिगंबर पाटील, दिलीप पाटील, संतोष पाटील, ज्ञानेश्वर चौधरी, प्रवीण चौधरी, प्रताप पाटील, नवलसिंग चौधरी, भीमराव उमाळे, भिका चौधरी, बाळू कोळी, भास्कर कोळी, रविंद कोळी, भाईदास कोळी, जयराम कोळी, पिंटू कोळी, किशोर कोळी, मुरलीधर कोळी, रामदास कोळी, मोहन कोळी, देविदास कोळी आदी हजारो कार्यकर्ते हजर होते.

Exit mobile version