Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

अपक्ष उमेदवार चंद्रशेखर अत्तरदे यांचा चिंचपूरा गावात प्रचार दौरा

WhatsApp Image 2019 10 09 at 11.25.35 AM

धरणगाव, प्रतिनिधी | अपक्ष उमेदवार चंद्रशेखर अत्तरदे यांचा झंझावाती प्रचार दौरा चिंचपूरा गावात आयोजित करण्यात आला आहे. गावातील महिलांनी चंद्रशेखर अत्तरदे यांचे औक्षण करून तसेच फुलहार घालून स्वागत केले. अत्तरदे यांच्या विजयासाठी गावकऱ्यांनी देवाकडे साकडे घातले.

जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार चंद्रशेखर अत्तरदे यांच्या प्रचार दौऱ्याप्रसंगी धरणगाव तालुक्यातील भाजपाचे प्रमुख पदाधिकारी तसेच चिंचपूरा गावचे सरपंच, बूथ प्रमुख, शक्ती केंद्र प्रमुख, पन्ना प्रमुख तसेच पदाधिकारी व ग्रामस्थ देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते. या दौऱ्याप्रसंगी जुनिअर मकरंद अनासपुरे, उपाध्यक्ष पी. सी. आबा पाटील, भाजपा ज्येष्ठ नेते सुभाष आण्णा पाटील, समाज कल्याण, सभापती प्रभाकर सोनवणे, भाजपा तालुका अध्यक्ष संजय महाजन, भाजपा शहर अध्यक्ष सुनिल वाणी, भाजपा तालुका सरचिटणीस सुनिल चौधरी , धरणगाव येथील नगरसेवक गुलाब मराठे, ललित येवले, कैलास माळी, सचिन पाटील, कांतीलाल माळी, भालचंद्र माळी, शरद आन्ना, राजेंद्र येवले, शिरीष आन्ना, शेखर पाटील, कन्हैय्या रायपूरकर, राकेश नन्नवरे (सरपंच, बांभोरी तथा तालुका सरचिटणीस, भाजपा युवा मोर्चा), निर्दोष पाटील (सरपंच, सोनवद) यांच्यासह असंख्य भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.

Exit mobile version