Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

बोदवड न्यायालयात स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

बोदवड-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी |  येथिल  दिवाणी व फौजदारी न्यायालयात सकाळी 7.50 वाजता ध्वजारोहण करण्यात आले. यानंतर झालेल्या कार्यक्रमात  स्वातंत्र्यासाठी शहीदांचे स्मरण  या विषयावर:- ॲड. अर्जुन पाटील यांनी खालील विचार मांडले.

 

देशाला स्वातंत्र्य मिळाल्यामुळेच देशामध्ये न्यायाचे, व समतेचे राज्य आले त्यामुळेच घटनेची निर्मिती करण्यात आली.स्वातंत्र मिळाले म्हणुनच देश प्रजासत्ताक झाला. घटनेच्या  सरनामा हा घटनेचा आत्मा आहे. सरनाम्यातील सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्षक, प्रजासत्ताक, गणराज्य या शब्दावरून असे दिसुन येते की, देशाची जनता ही सविधानाने दिलेल्या अधिकारानुसार सार्वभौम झालेली आहे. देशातील कोणत्याही नागरीकाचे जिवीत, वैयक्तीक, आर्थिक स्वातंत्र कोणीही हिरावुन घेवु शकत नाही. हे सर्व देश स्वातंत्र्य झाल्यामुळेच शक्य झाले आहे.

 

सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष न्या.क्यु.ए.एन. सरवरी होते. कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती – अर्जुन टी. पाटील अध्यक्ष बोदवड तालुका वकिल संघ, तर कार्यक्रमाचे सुत्र संचालन ॲड. के.एस.इंगळे, यावेळी स्वातंत्र्य दिनांचे महत्त या विषयावर ॲड. धनराज सी. प्रजापती, यांनी आपले विचार व्यक्त केले. त्यात त्यांनी सांगितले , भारत देश हा सर्वात जास्त युवाशक्तिचा देश असुन  विकसित होण्याच्या मार्गावर आहे.

 

सदर कार्यक्रमास ॲड.मिनल अग्रवाल, जोशी, गजानन बळीराम चौधरी ,ॲड.विजय मंगळकर, ॲड.मुकेश पाटील, ॲड.मोहीत अग्रवाल,.ॲड.अमोल पाटील , ॲड.तेजस्विनी काटकर,ॲड.आय.डी.पाटील, न्यायालयीन कर्मचारी  प्रशांतकुमार बेदरकर,जाधव भाऊसाहेब,  गरड भाऊसाहेब,सोनु थोरात, न्यायालयीन कर्मचारी वर्ग, बिलिफ वर्ग, पक्षकार वर्ग, पो.कॉ. आयुब गंभीर तडवी ,भुषण उत्तम सोनवणे, राजेश झा.महाजन,  प्रदिपकुमार चंद्रसिंग चव्हाण हे उपस्थित होते. या कार्यक्रमास रूपेश माळी ,शुभम इंगळे यांनी सहकार्य केले.

Exit mobile version