Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जामनेर नगरपरिषदेत साधनाताई महाजन यांच्याहस्ते ध्वजारोहण

जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | येथील नगरपरिषदेतर्फे आज स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

येथे अमृत महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शहरातील नगरपरिषद कार्यालयावर व नगरपालिका चौकात नगरपरिषद तर्फे लावण्यात आलेल्या शंभर फूट खांबावर ७५ फुटाचा तिरंगा लोकनियुक्त नगराध्यक्ष साधना महाजन यांच्या हस्ते फडकवण्यात आला. प्रारंभी साधनाताईंच्या हस्ते ध्वजस्तंभाचे पूजन करून मग झेंडा फडकावण्यात आला. याप्रसंगी राष्ट्रगीत झाल्यानंतर जोरदार आतषबाजी आणि राष्ट्रभक्तीपर घोषणा देण्यात आल्या.

यावेळी मुख्य अधिकारी चंद्रकांत भोसले, उपमुख्य अधिकारी दुर्गेश सोनवणे, उपनगराध्यक्ष प्राध्यापक शरद पाटील, नगरपालिका गटनेते डॉक्टर प्रशांत भोंडे, जामनेर तालुका एज्युकेशन सोसायटी जितेंद्र पाटील नगरसेवक अतिष झाल्टे, बाबुराव हिवराळे, महेंद्र बाविस्कर यांच्यासह नगरसेवक जामनेर शहरातील आनंद यात्री परिवारातील सदस्य तसेच शहरातील नागरिक मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होते.

Exit mobile version