Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जिल्ह्यात आज ४७ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह

जळगाव प्रतिनिधी । जिल्हा कोवीड रूग्णालयातर्फे आज प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्ह्यात ४७ रूग्ण आढळून आले आहेत. तर २८ बाधित रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर आज एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

आजची आकडेवारी

जळगाव शहर-२८, जळगाव ग्रामीण- ००, भुसावळ-०२, अमळनेर-०१, चोपडा-०१, पाचोरा-०२, भडगाव-०१, धरणगाव-००, यावल-००, एरंडोल- ००, जामनेर-००,  रावेर-००, पारोळा-००, चाळीसगाव- ०९, मुक्ताईनगर-००  आणि बोदवड -०२ असे एकुण ४७  बाधित रूग्ण आढळून आले आहे.

आजच्या अहवालानुसार जिल्ह्यात आतापर्यंत ५७ हजार ३५४  बाधित रूग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी ५५ हजार ६६५ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. तर १ हजार ३६० रूग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या ३२९ रुग्णांवर उपचार सुरु आहेत अशी माहिती जिल्हा कोवीड रूग्णालयाच्या वतीने कळविण्यात आले आहे.

 

Exit mobile version