Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

यावल तालुक्यात हिवताप, खोकला व डेंग्यू रूग्णांच्या संख्येत वाढ

यावल प्रतिनिधी । कोरोना रूग्ण संख्या कमी होत असतांना आता यावल तालुक्यातील हिवताप, खोकला आणि डेंग्यू सदृष्य असलेल्या रूग्ण संख्येत वाढत झाल्याचे दिसून येत आहे. याप्रकरणी यावल नगरपरिषदेने सतर्क राहण्याची मागणी नागरीकांकडून केली जात आहे.

जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा जिवघेणा गोंधळ अद्याप संपलेला नसतांना यावल शहरात व परिसरात गेल्या काही दिवसांपासून हिवताप , खोकला, डेंग्युसदृष्यच्या रुग्णांमध्ये मोठी वाढ झाली आहे.  यावलच्या ग्रामीण रुग्णालयात ओपीडी संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे.  यात लहान मुलांचा मोठा सहभाग दिसून येत होता. ग्रामीण रुग्णालयापासून तर खाजगी दवाखान्यात रुग्णांची प्रचंड गर्दी दिसुन येत आहे. दरम्यान यावल शहर व परिसरासह तालुक्यात सर्वत्र डेंग्युच्या सदृष्य आजाराने थैमान घातले आहे. दिवसेंदिवस साथीच्या आजाराच्या रूग्णांच्या संख्येत कमालीची वाढ होत आहे.

यावल नगर परिषदच्या वतीने तात्काळ युद्धपातळीवर स्वच्छता मोहीम राबविणे, नागरीकांमध्ये आरोग्याविषयी दवंडी व्दारे जनजागृती करणे , महीन्यातुन किमान दोन वेळा जंतुनाशक धुर फवारणी करणे , शहरात रुग्णांची झपाट्याने वाढ होत असुन , आरोग्य विभागाच्या माध्यमातुन घरोघरी जावुन प्रत्येक कुटुंबाची आरोग्य तपासणी करणे त्याचबरोबर शहरातीत काही प्रभागामध्ये वरहांची संख्या प्रचंड प्रमाणावर वाढली असुन ती तात्काळ कमी करावी अशा विविध नागरीकांच्या आरोग्याशी निगडीत प्रश्नावर तात्काळ यावल नगर परिषदने लक्ष केन्द्रीत करावे अशी मागणी नागरीकांकड्डन होत आहे .

Exit mobile version