Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ ; सरकारकडून दिवाळी ऑफर

prakash javadekar

नवी दिल्ली प्रतिनिधी । दिवाळीच्या तोंडावर केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठी भेट दिली आहे. केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात पाच टक्के घसघशीत वाढ केली असून मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याची घोषणा केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केली आहे.

केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज याबाबतची घोषणा केली. नव्या निर्णयामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांचा भत्ता १२ टक्क्यांवरून १७ टक्के झाला आहे. वाढीव भत्ता जुलै २०१९ पर्यंत कर्मचाऱ्यांना मिळणार आहे. या निर्णयाचा फायदा ५० लाख कर्मचारी व ६५ लाख निवृत्तीवेतन धारकांना मिळणार आहे. या निर्णयामुळे सरकारच्या तिजोरीवर १६ हजार कोटी रुपयांचा अतिरिक्त बोजा पडणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाची आज बैठक झाली. मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. या बैठकीत केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ करण्याबरोबरच इतरही निर्णय घेण्यात आले.

Exit mobile version