Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

रोजंदारी कर्मचार्‍यांना सेवेत समावून घ्यावे – मागणी

यावल प्रतिनिधी । आदिवासी आश्रमशाळांमधील रोजंदारीवर काम करणारे श्रेणी-३ व श्रेणी-४ मधील सर्व कर्मचार्‍यांना सेवेत सामावून घ्यावे अशी मागणी आदिवासी कृती समितीने केली आहे.

 राज्यातील आदीवासी विकास आदीवासी आश्रमशाळेतील सर्व वर्ग३व वर्ग ४रोजंदारी / तासिका यांचे राज्य शासन सेवेत समायोजन करण्यात यावे ही मागणी वारंवार करण्यात येत असुन ही शासनाच्या वतीने कुठल्याही प्रकारचे प्रतिसाद मिळत नसल्याने दिनांक ११ / १२ / २० रोजी नाशिक येथील आदीवासी आयुक्त कार्यालय ते मुंबई मंत्रायलयापर्यंत बिऱ्हाड मोर्चा आदीवासी विकास विभाग वर्ग३व४ रोजंदारी कृती समितीच्या वतीने काढण्यात येणार असल्याचा ईशारा निवेदन यावल येथे आदिवासी जिल्हा प्रकल्प अधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. 

दरम्यान यावल येथे आदीवासी विकास प्रकल्प विभागास आदिवासी बांधवांच्या मागण्यांसाठी देण्यात आलेल्या जिल्हा प्रकल्प अधिकारी विनिता सोनवणे यांना देण्यात आलेल्या निवेदनावर आदीवासी विकास विभाग रोजंदारी कृती समितीचे महेश यशवंत पाटील , चंद्रकांत का . गावीत , श्रीमती रूपाली कहांडोळे , श्रीमती रेणुका सोनवणे , सचिन शशीकांत वाघ ,संतोष के . कापुरे , जब्बार तडवी , अण्णासाहेब हुलावडे , याकुब तडवी ,वटया चिमा पावरा , जुम्मा मिरखा तडवी , अशोक पावरा यांच्यासह आदी संघटनेच्या पदाधिकारी यांच्या स्वाक्षरी आहे.

 

Exit mobile version