Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

कोरोना योध्द्यांना आरोग्य सेवेत सामावून घ्या- खा. उन्मेष पाटील

चाळीसगाव प्रतिनिधी । कोरोनाच्या आपत्तीत मोलाची कामगिरी करणार्‍या कोरोना योध्द्यांना आरोग्य सेवेत सामावून घ्यावे अशी मागणी खासदार उन्मेष पाटील यांनी केली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार व राज्य सरकारच्या विविध संस्था व अभियानाच्या माध्यमातून सेवा देणाऱ्या राज्यभरातील विविध पदांवरील कोविड सेंटर मध्ये काम करणारे कंत्राटी, हंगामी, रोजंदारी अधिकारी व कर्मचारी वर्गाची सेवा समाप्तीची तयारी शासनाने सुरू केली असून हा या कोरोना योध्यांवर अन्याय असून त्यांना आरोग्य यंत्रणेत इतरत्र सेवेत समावेश करू करून त्यांचा रोजगार कायम राहील तसेच राज्याची आरोग्य यंत्रणा अधिक सदृढ करण्यास मदत होईल. अशी मागणी आज खासदार उन्मेषदादा पाटील यांनी जिल्हाधिकारी यांचेशी चर्चा करताना केली आहे.

आज चाळीसगाव येथील कोविड सेंटर मध्ये कंत्राटी सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांनी खासदार उन्मेषदादा पाटील यांना निवेदन दिले याप्रसंगी राहुल पवार ,चेतन गुढेकर, भूषण महाजन, किशोर पाटील ,द्वारका लव्हारे, भाग्यश्री राठोड ,सुवर्णा पवार, कुंदन माळी, आम्रपाली म्हसदे, सोनाली गिरासे, आशा निकम, पूनम जाधव, उज्वला मोरे, सुवर्णा मोरे, सुनिता कोळी, जयश्री जगदाळे, सरस्वती मालचे आदी कर्मचारी उपस्थित होते. कोविड सेंटर मध्ये काम करणारे कंत्राटी, हंगामी, रोजंदारी अधिकारी व कर्मचारी वर्गाची सेवा समाप्तीची तयारी शासनाने केल्याने हे कर्मचारी हवालदिल झाले आहेत. अडचणीच्या काळात काम करून आता सेवा समाप्ती केली जात आहे.अशी भावना या कर्मचाऱ्यांमधे निर्माण झाली आहे. जेव्हा नागरिकांच्या जीविताचे रक्षण करणारी यंत्रणेत कोणीही काम करायला तयार नव्हते अशा प्रसंगी आपले अमूल्य योगदान देणारे कंत्राटी कर्मचारी यांना आरोग्य सेवेत समावून घेण्यात यावे याकडे शासनाचे लक्ष वेधले आहे.

Exit mobile version