Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

सावदा येथे वैशिष्ट्यपुर्ण निधी अंतर्गत विविध विकास कामांचे उद्घाटन

सावदा ता. रावेर प्रतिनिधी | सावदा नगर परिषद येथे वैशिष्ट्यपूर्ण निधीअंतर्गत योजनेच्या विविध विकास कामांचे उद्घाटन झाले.

यावेळी खासदार रक्षा खडसे यांनी वैशिष्ट्यपूर्ण निधीअंतर्गत योजनेच्या विविध विकास कामांचे फित कापून उद्घाटन केले. तसेच उपस्थितांना योजनेंविषयीची माहिती सांगून मार्गदर्शन केले.

वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत प्राप्त अनुदानातून विविध विकास कामांचे उद्घाटनप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्यासह खासदार रक्षाताई खडसे प्रमुख पाहुणे तथा उद्घाटक म्हणून उपस्थित होत्या.

यावेळी माजी मंत्री एकनाथराव खडसे, खासदार, रक्षाताई खडसे यांच्यासह जिल्हा बँकेच्या माजी अध्यक्षा रोहिणी खडसे-खेवलकर, सावदा नगराध्यक्षा अनिताताई येवले, सर्व सावदा नगरपरिषद नगरसेवक, भाजपा सावदा शहराध्यक्ष पराग पाटील, बेटी बचाव बेटी पढाव जिल्हा संयोजिका सारिका चव्हाण आणि जे.के.भारंबे आदींची उपस्थिती होती.

Exit mobile version