Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

अमळनेर येथे उद्या विविध विकासकामांचे उद्घाटन

अमळनेर प्रतिनिधी । येथील नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक ७ मधील श्रीराम नगरात विविध विकासकामांचे उद्घाटन उद्या (दि.२२ ऑक्टोबर) रोजी सायंकाळी ५ वाजता कर्जत जामखेडचे आ.रोहित पवार व संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रविण गायकवाड यांच्या हस्ते होणार आहेत.

प्रभाग क्रमांक ७ मधील ढेकू  रस्त्यावरील श्रीराम नगर जवळील खुल्या भूखंडावर नगरसेवक,आरोग्य सभापती तसेच संभाजी ब्रिगेड चे जिल्हाध्यक्ष शाम पाटील यांच्या संकल्पनेतून संत तुकाराम महाराज व छत्रपती शिवाजी महाराज यांचे भक्ती-शक्ती शिल्प तसेच लोकनेते शरदचंद्रजी पवार अभ्यासिका उभारण्यात आलेली आहे.यांचे उदघाटन यावेळी पार पडणार आहे.कार्यक्रमाला आमदार अनिल भाईदास पाटील,माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील तसेच लोकनियुक्त नगराध्यक्षा पुष्पलता साहेबराव पाटील यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.या विकासकांमुळे ढेकू रस्त्याच्या सुशोभिकरणात मोठी भर पडणार आहे.

 

Exit mobile version