Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

मुळजी जेठा महाविद्यालयातील एकलव्य क्रीडा संकुलात तीन दिवसीय कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन (व्हिडीओ)

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील मुळजी जेठा महाविद्यालयातील एकलव्य क्रीडा संकुलात जळगाव जिल्हा कृषि विभागाच्या वतीने तीन दिवसीय कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन कृषिमंत्री अब्दुल सत्तार, गुरूमाऊली अण्णासाहेब मोरे यांच्याहस्ते शुक्रवार ७ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता करण्यात आले.

या कार्यक्रमाला पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, आमदार चंद्रकांत पाटील, आमदार राजूमामा भोळे, आमदार लता सोनवणे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रोहिणी खडसे, बर्‍हाणपूरचे आमदार शेराभैय्या, बर्‍हाणपूरच्या महापौर माधुरी पटेल, खंडव्याचे खासदार ज्ञानेश्‍वर पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रवींद्रभैय्या पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, उद्योजक श्रीराम पाटील, भाजपचे नेते पी.सी. पाटील आदी मान्यवरांची उपस्थिती आहे.

दिंडोरी प्रणीत श्री स्वामी समर्थ केंद्राचे संस्थापक गुरूमाऊली अण्णासाहेब मोरे यांच्या हस्ते कृषी महोत्सवाला आयोजीत मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी मार्गदर्शन करतांना गुरूमाऊली अण्णासाहेब मोरे यांनी मार्गदर्शन करतांना सांगितले की, महाराष्ट्र राज्यात काळ्या मातीची सेवा करणारे शेतकरी बांधव अधिक प्रमाणावर आहे. शेतकऱ्यांनी नैसर्गिक पध्दतीने शेती करावी याचा कास धरावा, जेणे करून पुढची पिढी निरोगी व सदृढ निर्माण होईल, व शेतीची आवड निर्माण होईल, यासाठी महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांच्या हितासाठी योजना राबवावी असे विनंती गुरूमाऊली अण्णासाहेब मोरे यांनी शासनाला केली.

Exit mobile version