Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

सुर्योदय जेष्ठ नागरीक संघाच्या सभागृहाच्या नूतनीकरणाच्या बांधकामाचे उद्घाटन

एरंडोल प्रतिनिधी । शहरातील सुर्योदय जेष्ठ नागरिक संघाच्या सभागृहाच्या नूतनीकरणाच्या बांधकामाचा उद्घाटन सोहळा नुकताच पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आ. महेंद्रसिंग पाटील हे होते.

महाराष्ट्र प्रदेश जनजागृती क्षेत्र प्रमुख ॲड. किशोर काळकर यांच्याहस्ते दिप्रज्वलन करण्यात आले तर कोनशिलेचे अनावरण माजी उप नगराध्यक्षा छाया दाभाडे यांच्याहस्ते करण्यात आले. प्रमुख अतिथी म्हणून नगराध्यक्ष रमेश परदेशी, मुख्याधिकारी विकास नवाळे, माजी नगराध्यक्ष देविदास महाजन, सामाजिक कार्यकर्ते आनंद दाभाडे, नगरसेवक नितीन महाजन, डॉ.नरेंद्र ठाकुर, नगरसेविका वर्षा शिंदे, ॲड. ओम त्रिवेदी, उद्योजक पंकज काबरे, कृष्णा धनगर, लक्ष्मण महाजन हे उपस्थित होते. याप्रसंगी नगराध्यक्ष रमेश परदेशी यांनी संघाचे दैनंदिन कामकाज पाहून समाधान व्यक्त केले व नगरपालिकेतर्फे सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. तसेच ॲड.किशोर काळकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्र सरकार तर्फे सुरु जाहीर केलेल्या ज्येष्ठांच्या योजनांची माहिती दिली व त्यातुन संघासाठी काही उपक्रम राबविण्या बाबत चर्चा केली.याप्रसंगी माजी नगराध्यक्ष देविदास महाजन,माजी उप नगराध्यक्षा छाया दाभाडे,मुख्याधिकारी विकास नवाळे यांची भाषणे झाली व शेवटी अध्यक्षीय माजी आमदार महेंद्रसिंग पाटील यांनी संघाच्या कार्याचे कौतुक करीत नवनविन उपक्रम राबवून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी अभ्यासिका उपलब्ध करून देण्याचे अवाहन केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक संघाचे अध्यक्ष निवृत्त तहसिलदार अरुण माळी यांनी केले.प्रार्थना नामदेव पाटील यांनी गायली.सूत्रसंचलन पी.जी.चौधरी यांनी केले. कवि निंबा बडगुजर यांनी कवितेतून परिचय व कार्याची स्तुती केली.आभार संघाचे सचिव विवेक कुलकर्णी यांनी मानले. यावेळी संघाचे सभासद आर.एन.पाटील, पी.जी.चौधरी, विश्वनाथ पाटील, रमेश जोशी, सत्यनारायण तोतले, नवल चव्हाण यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. कार्यक्रम यशस्वितेसाठी संघाचे उपाध्यक्ष जाधवराव जगताप, वसंत पाटील, गणेश पाटील, भगवान महाजन, जगन महाजन, सुपडू शिंपी, सुर्यकांत ठाकुर, भास्कर बडगुजर यांनी परिश्रम घेतले तर कार्यक्रमाला प्रा.शिवाजीराव अहिरराव, सखाराम ठाकुर, मधुकर तिवारी, सुभाष जाखेटे, सुरेश देशमुख, बाबुलाल लोहार, सुभाष दर्षे, राजेंद्र शिंदे, गणसिंग पाटील, प्रकाशचंद तोतले, रघुनाथ पाटील, अरूणा पाटील, हितेश जोगी, पंडित ठाकुर, पंडित महाजन, सदाशिव शिंपी, लक्ष्मीकांत पाटील, भिमराव पाटील, हरी पाटील, रामराव महाजन, सरलाबाई पाटील उपस्थित होते.

 

Exit mobile version