Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पाचोरा येथे श्रीराम मंदिर निधी समर्पण कार्यालयाचे उद्घाटन

पाचोरा, प्रतिनिधी । श्रीराम जन्मभूमि तीर्थक्षेत्र आयोध्या येथील श्रीराम मंदिर निधी समर्पण अभियान अंतर्गत पाचोरा तालुका कार्यालयाचे उद्घाटन  दि. ५ जानेवारी २०२० रोजी रोटरी क्लबचे माजी अध्यक्ष राजेश मोर यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात पार पडला.

भारत माता प्रतिमा पूजन प्रभू श्रीराम प्रतिमापूजन करून प्रमुख महंतांच्या हस्ते  कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. श्रीराम मंदिर निधी समर्पण अभियान अंतर्गत पाचोरा तालुका कार्यालय उद्घाटन प्रसंगी परमपूज्य महंत श्री. चिदानंद स्वामी (गंगानंद आश्रम, घोसला), व पाचोरा येथील श्रीराम मंदिरचे प्रमुख महंत निळकंठ महाराज, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विभागीय कार्यकारणी सदस्य सुनिल सराफ, समर्पण अभियानाचे जिल्हा स्वागत समिती सदस्य रमेश मोर, समिती संयोजक महावीर गौड, रमेश मोर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पाचोरा संघचालक दिनेश अग्रवाल आदी मान्यवर उपस्थित होते.

यानिमित्ताने आयोध्या येथील श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ठिकाणी उभारल्या जाणाऱ्या प्रभू श्रीराम मंदिराचा निधी समर्पण भावनेने देणाऱ्या तमाम जनतेच्या सोयीसाठी पाचोरा येथील बस स्टॅन्ड रोडवर मानसिंगका फॅक्टरी च्या गेट समोर, गणेश प्लाझा येथे शहरातील मध्यवर्ती ठिकाणी या कार्यालयाचे थाटात उद्घाटन करण्यात आले. श्रीराम मंदिर बांधकामासाठी चा समर्पण निधी संकलित करण्यासाठी संपूर्ण स्वयंसेवक व यंत्रणा जनतेच्या घरोघरी जाऊन भेटी देणार असून हा संपूर्ण निधी रोख, तसेच धनादेश आणि ऑनलाइन स्वरूपात स्विकारला जाणार आहे. यासाठी पाचोरा शहर व तालुक्याचे विभागवार रचना करण्यात आलेली असून १५ जानेवारी ते  १५ फेब्रुवारी दरम्यान पाचोरा तालुक्यातुन श्रीराम मंदिर निधी उभारला जाणार आहे. 

या कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी संतोष मोरे, अग्रवाल समाजाचे अध्यक्ष मोहन अग्रवाल, मनिष काबरा, अनिल वाघ, दिलीप पाटील, अतुल पाटील, विकास लोहार, संतोष माळी, गिरीश बर्वे यासह प्रमुख मान्यवर व पदाधिकारी उपस्थित होते. उद्घाटन समारंभाचे प्रास्ताविक सुनिल सराफ यांनी केले. निखिल शिरोडे यांनी सूत्रसंचालन तर राजू बाळकर यांनी आभार मानले. यानिमित्ताने अभिलाष बैरागी यांनी प्रेरणा गीताचे गायन गायले.

 

Exit mobile version