Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

कुर्‍हा महाविद्यालयात आत्मनिर्भर युवती अभियानाचा शुभारंभ

मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील कुर्‍हा येथील महाविद्यालयात आत्मनिर्भर युवती अभियानाचा शुभारंभ करण्यात आला.

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव विद्यार्थी विकास विभाग व प.पू माधव सदाशिव गोळवलकर गुरुजी सार्वजनिक संस्था संचलित कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय कुर्हा काकोडा विद्यार्थी विकास विभाग व युवती सभा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आत्मनिर्भर युवती अभियान सहा दिवसीय कार्यशाळा दिनांक ८ फेब्रुवारी ते १४ फेब्रुवारी २०२४ या कालावधीत राबविण्यात येत आहे.

कार्यशाळेच्या पहिल्या दिवशी दिनांक ८ फेब्रुवारी रोजी आत्मनिर्भर युवती अभियानाचे उद्घाटन मुक्ताईनगरचे पोलीस निरीक्षक नागेश मोहिते यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रल्हाद बढे होते. सदर कार्यशाळेचे प्रास्ताविक प्रा पी एस राठोड विद्यार्थी विकास अधिकारी यांनी केले आणि प्रमुख मार्गदर्शक पोलीस कॉन्स्टेबल मुक्ताईनगर रवींद्र तायडे यांनी समाज माध्यमे वापरताना घ्यावयाची काळजी या विषयावर मार्गदर्शन करताना समाज माध्यमांमध्ये मोबाईल व इतर उपकरणांचा वापर करताना युवतीनी काळजीपूर्वक व सतर्कता पूर्वक वापर करावा. तसेच नागेश मोहिते पोलीस निरीक्षक मुक्ताईनगर यांनी महिलांसाठी असलेले विविध कायदे व त्यांचे अधिकार यांच्यावर मार्गदर्शन केले.

युवतींनी आत्मनिर्भर होण्यासाठी स्वतः पुढे येऊन धाडस करणे गरजेचे आहे व आपल्याला येणार्‍या अडचणी व समस्या जर सुटत नसतील तर कायद्याचा वापर करून पोलिसांची मदत घ्यावी आपला जर कोणी मानसिक व शारीरिक छळ करत असेल तर त्याला वेळीच विरोध करून आत्मसंरक्षण करावे आत्मसंरक्षण करताना कोणकोणत्या मार्गाचा वापर करावा या संदर्भात पोलीस निरिक्षकांनी माहिती दिली.

बापू महाले जळगाव जनता सहकारी बँक ली.मार्केटिंग विभाग प्रमुख यांनी बँक व्यवहाराविषयी मार्गदर्शन करताना युवतींना बँकेच्या खाते विषयक व बँक विद्यार्थ्यांना कशा प्रकारच्या सोयी सुविधा उपलब्ध करून देतात जसे की शिक्षणासाठी कर्ज बँकेच्या विविध योजना व बँकेतील खाते बँकेचे व्यवहार कसे केले जातात केवायसी काय असते अशी पूर्णपणे बँकेच्या व्यवहाराची माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. गीता वाघ यांनी केले आभार प्रदर्शन प्रा अतुल तेली व शितल मस्के यांनी केले कार्यक्रमाला महाविद्यालयातील प्राचार्य प्राध्यापक प्राध्यापिका व ७५ विद्यार्थीनींचा सहभाग होता.

Exit mobile version