Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

रावेरात मेट्रो मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल रिह्याबिलिटेशन सेंटरचे उद्घाटन

रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | रावेर शहरात मेट्रो मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल येथे बिएमडी फ्री कॅम्प व सिकलसेल ट्रिटमेंट तसेच रिह्याबिलिटेशन सेंटरचे अनिल चौधरी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. शहरातील डॉ.शब्बीर शेख यांचे मेट्रो मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल मध्ये आदर्श बहुउद्देशिय् संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने उत्तर महाराष्ट्रातील पहिलेच आदर्श सिकलसेल ट्रिटमेंट व रिह्याबिलिटेशन सेंटर सुरु करण्यात आले आहे. आज या शिबिरात बिएमडी फ्री कॅम्प करण्यात आले. त्यासाठी डॉ असिफ शेख भुसावळ अस्थीरोग तज्ञ् यांनी रुग्णांना तपासून मोफत औषधं उपचार केले.तसेच सिकलसेल ॲनिमिया रुग्णासाठी विशेष मोफत ओपीडी सुरू करण्यात आली आहे. रावेर शहरातील या हॉस्पिटल मध्ये जिल्ह्यातील सर्व सिकलसेल रुग्णांसाठी मोफत ओपिडी असेल असे रुग्णालयाच्या वतीने सांगण्यात आले. याठिकाणी सिकलसेल आजाराच्या रुग्णांची संपूर्ण तपासणी व पाठपुरावा,समुपदेशन एकाच छताखाली केले जाईल जेणेकरून पीडीतांना भटकंती करावी लागणार नाही.

मेट्रो मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल संचालक डॉ.शब्बीर शेख यांनी आपल्या मनोगतात म्हटले कि, सिकलसेल रुग्णाना ट्रिटमेंट व रिह्याबिलिटेशन सेंटर च्या माध्यमातून मोफत समुपदेशन, मोफत औषधी, मोफत रक्तसंक्रमन, संपूर्ण मोफत आरोग्य तपासणी याद्वारे सेवा मिळणार आहे. या रुग्णांसाठी मेट्रो हॉस्पिटल व आदर्श संस्था सिकलसेल रुग्णांसाठी सदैव कार्यरत राहील असे आश्वासित केले आहे. यावेळी माजी नगराध्यक्ष गोटू शेट,हरीश गणवानी, माजी नगरसेवक असिफ मोहम्मद ,मुताल्लीब मेंबर,राष्ट्रवादी शहराध्यक्ष मेहमूद हाजी,युसूफ भाई,दंतरोग विशेषतज्ञ् , डॉ रुबीना शेख स्त्री रोग विशेषतज्ञ्,डॉ हुझेफा शेख,समीर शेख मॅनेजजिंग डायरेक्टर. व रावेर शहरातील अनेक मान्यवर उपस्थित होते.

Exit mobile version