Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

वरणगावात पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन

वरणगाव प्रतिनिधी । पोलीस स्टेशनच्या सभागृहात वरणगाव सिव्हिल सोसायटी व पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने पोलीस भरती पुर्व प्रशिक्षण शिबीराचे उद्घाटन समारंभ आयोजित करण्यात आला होता. 

सर्वच नोकरीच्या संधीसाठी तुम्हाला लेखी परिक्षा द्यावी लागत असते. लेखी परिक्षेत यश संपादन केल्यानंतर तुम्हाला पुढील चाचण्यासाठी पात्र ठरत असतात. लेखी परिक्षेची तयारी करत असताना विद्यार्थ्यांनी स्वत:ला प्रश्न विचारत एकाग्र व्हा. स्वत:ला पुढे काय करायचे ते आधी ठरवा. तसेच स्पर्धा परिक्षेत यश मिळवायचे असेल तर राजकारण, क्रीडा, समाज कार्य, इतर घडामोडी समजून घेण्याचे एकमेव साधन म्हणजे वृत्तपत्र होय. यामुळे वाचनाची सवय तर जडते परंतु आपली बुध्दी चौकस होत सर्वच इतंमभुत घटनांची माहीती मिळत असते. याकरीता अभ्यासा सोबतच नियमित वृत्तपत्राचे वाचन करत नियमीत सराव केल्यास स्पर्धा परिक्षेत यशस्वी व्हाल असा सल्ला वरणगाव नगरपालीकेेचे मुख्याधिकारी समीर शेख यांनी दिला. 

यावेळी मुक्ताईनगरचे पोलिस उपविभागीय अधिकारी विवेक लावंड , सहाय्यक पोलिस निरीक्षक संदिप बोरसे, योगेश पाटील, संजय घुंगे, जयंत जोशी, मुख्याध्यापीका चव्हाण मॅडम, सुनील काळे, सुभाष वाघ, शेख सईद, राजेंद्र चौधरी, समाधान चौधरी याच्यासह पोलिस भरती प्रशिक्षणार्थी उपस्थितीत होते. सूत्रसंचालन –  गोपाळ बाणाईत यांनी केले तर आभार श्रीकांत माळी यांनी मानले.

 

Exit mobile version