शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ‘मायक्रोटॉक’ चर्चासत्राचे उद्घाटन

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात मानवी शरीरातील जिवाणू व विषाणू यांचे अचूक निदान करण्याच्या नवीन पद्धतीविषयी ‘मायक्रोटॉक’ हे चर्चासत्राचे उद्घाटन अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांच्याहस्ते करण्यात आले. चर्चासत्रात विविध विषयांवर मान्यवरांनी मार्गदर्शन करीत माहिती दिली.

 

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आयएमए संस्थेचे पदाधिकारी डॉ. भरत बोरोले, सूक्ष्मजीव शास्त्र विभागाचे प्रमुख तथा उप अधिष्ठाता डॉ. किशोर इंगोले, डॉ. उल्हास पाटील महाविद्यालयाचे डॉ. कैलास वाघ, वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजय गायकवाड, बायो इनोव्हेशन संस्थेच्या समृद्धी पाटील, चर्चासत्राचे आयोजक सचिव डॉ. दिव्या शेकोकार मंचावर उपस्थित होते.

 

यावेळी डॉ. जयप्रकाश रामानंद म्हणाले की, वैद्यकीय क्षेत्रात नवनवीन संशोधन होणे गरजेचे आहे. विविध आजारांमध्ये जिवाणू व विषाणू यांचे निदान उपचार करणेकामी महत्वाचे असते. त्यातील नवीन माहिती जाणून घेण्यासाठी हे चर्चासत्र महत्वाचे ठरणार असल्याचे सांगितले. दिवसभरामध्ये डॉ. किशोर इंगोले, डॉ. कैलास वाघ यांनी रुग्णांच्या शरीरावर चिकित्सा करून लवकर रोगनिदान करण्याविषयी चर्चा केली.

चर्चासत्रासाठी खासगी डॉक्टर्स, आयएमए  सभासद, वैद्यकीय शिक्षण घेत असलेले विद्यार्थी उपस्थित होते. डॉ. भाग्यश्री पाटील, डॉ. गौरांग चौधरी, राकेश सोनार, किशोर सूर्यवंशी, दीपक सूर्यवंशी. राकेश पिंपरकर आदींनी परिश्रम घेतले.

Protected Content