Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

कोरपावलीत पेव्हर ब्लॉकचे उद्घाटन

यावल – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील मौजे कोरपावली ग्रामपंचायत अंतर्गत पेव्हर ब्लॉक बसविण्याचे काम माजी आ.चंद्रकांत सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार लताताई सोनवणे यांच्या हस्ते स्थानिक विकास निधी विकास कामाचा शुभारंभ करण्यात आला. कोरपावली गावातील विकास कामाचा शुभारंभ समारंभ माजी आ.चंद्रकांत सोनवणे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

कोरपावली गावामध्ये चोपडा विधानसभा क्षेत्राच्या आ.लताताई सोनवणे यांचे आगमन होताच फटाक्यांची आतिषबाजी तसेच ढोल ताशांच्या गजरात मोठ्या उत्साहाच्या वातावरणात त्यांचे स्वागत करण्यात आले.

सदरील काम हे गावातील पाटील वाडा परिसरात करण्यात येत असून, अंदाजित किंमत ही ५ लक्ष आहे. सदर कार्यक्रमास सरपंच विलास अडकमोल, मोहराळा सरपंच नंदा गोपाळ महाजन, ग्राम पंचायत सदस्य सत्तार तडवी, आरिफ तडवी, जुम्मा तडवी, शाखा अध्यक्ष भरत चौधरी शाखा उपाध्यक्ष प्रविण अडकमोल, अविनाश अडकमोल, भिमराव इंधाटे, किसन तायडे, समाधान अडकमोल, मनोज अडकमोल, अजय अडकमोल, उमेश जावळे, गजानन कोळी, सूर्यभान पाटील, भरत चौधरी यावल, प्रकाश कोळी, समाधान कोळी, अरुण भालेराव, विक्की अडकमोल, सचिन भालेराव, माजी ग्रा. पं. सदस्य राजू पाटिल, दत्तात्रय महाजन, युगल पाटील, प्रमोद महाजन, विनायक पाटील विशेष करून या कार्यक्रमास महिलांची उपस्थिती ही लक्षणीय होती.

या विकास कामांच्या प्रसंगी आमदार लताताई सोनवणे तसेच माजी आ.चंद्रकांत सोनवणे व उपस्थित मान्यवरांचे समस्त गावकऱ्यांच्या वतीने गावातील प्रथम नागरीक सरपंच विलास अडकमोल यांनी आभार मानले.

Exit mobile version