Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जळगावात तक्रार निवारण केंद्राचे उद्घाटन

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । सैन्य दलाच्या तिन्ही दलातील आजी-माजी सैनिक व त्यांच्या परिवारासाठी जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात कंट्रोल रूममध्ये आज तक्रार निवारण केंद्राचे उद्घाटन करण्यात आले.

यावेळी पोलीस उप अधीक्षक(गृह) संदीप गावित, स्टेशन हेड क्वाटर्स भुसावळ, कर्नल अ.क. नायडू यांच्या हस्ते तक्रार निवारण केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. ही  सुविधा राबविण्यासाठी स्टेशन हेड क्वाटर्स भुसावळ व जिल्हा सैनिक वेल्फेअर यांच्या प्रयत्नांनी व जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली ही सुविधा सुरु करण्यात आली. यावेळी तक्रार निवारणासाठी हेल्प लाईन नंबर देखील जारी करण्यात आला. जिल्ह्यातील सेवारत व सेवानिवृत्त सैनिकांसाठी व त्यांच्या कुटुंबीयांना या तक्रार निवारण मदत केंद्राचा लाभ होणार आहे. तरी  सैनिकांनी तक्रार निवारणासाठी या 7620205692 क्रमांकावर संपर्क करावा असे आवाहन जिल्हा पोलीस दलाच्या वतीने करण्यात आले आहे.

पोलीस बिनतारी संदेश विभागाचे पोलिस उप निरीक्षक फारुख तडवी, संजय मराठे, सहाय्यक फौजदार दिपक पुजारी, सागर पाटील, अमित माळी, संघपाल तायडे तसेच सैनिक कल्याण बोर्डचे जनार्दन महाजन उपस्थित होते.

Exit mobile version