Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

धरणगाव येथे महात्मा गांधी उद्यानातील कामाचे पालकमंत्र्यांच्या हस्ते उदघाटन

धरणगाव, प्रतिनिधी । येथील महात्मा गांधी उद्यानाचा 2 कोटी रुपयांचा कामाचा शुभारंभ जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी पालकमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त गुलाबराव वाघ यांच्या सहसंपर्क प्रमुखपदी निवड झाल्या बद्दल व विष्णू भंगाळे यांची जिल्हा प्रमुखपदी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.

कै. सलीम पटेल यांच्या स्वप्न पूर्तीचे खऱ्या अर्थाने आज सुरुवात झाली, अनेक वर्षापासून सलीम पटेल यांचे स्वप्न होते. धरणगाव येथे अतिशय चांगल्या पद्धतीचे उद्यान व्हावे, त्यात ज्येष्ठ नागरिक, महिला, युवक व बालक यांना आधुनिक पद्धतीचे साहित्य तसेच सुंदर असे उद्यान व्हावे ते आज खऱ्या अर्थाने पूर्णात्वत आले. तसेच 30 कोटी रुपयांच्या नवीन पाईप लाईनच्या कामाला सुद्धा शासनाची मंजुरी मिळाली असून न. पा निवडणुकीपुर्वी कामाला सुरुवात होणार असून त्यानंतर नियमित पाणीपुरवठा सुद्धा होईल, असे प्रतिवादन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.

प्रमुख अतिथी म्हणून जळगाव लोकसभा सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, उपजिल्हा प्रमुख पी एम पाटील, गटनेते पप्पू भावे, मुख्याधिकारी जनार्दन पवार, उपनगराध्यक्ष कल्पना महाजन, नगरसेविका अंजली विसावे, राजेंद्र ठाकरे, राजेंद्र महाजन, योगेश वाघ, संतोष महाजन आदी मान्यवर उपस्थित होते. सर्व मान्यवरांचा सत्कार तौसीफ पटेल, संजय चौधरी, विजय महाजन, वासुदेव चौधरी यांनी केले. सूत्रसंचालन व प्रास्ताविक पी एम पाटील यांनी केले. आभार प्रदर्शन विनोद रोकडे यांनी मानले. कार्यक्रमास सर्व नगरसेवक युवासेना शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.

Exit mobile version