Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

भुसावळ येथे अपक्ष उमेदवार डॉ.मधू मानवतकर यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन (व्हिडीओ)

 

 

भुसावळ, प्रतिनिधी | येथील विधानसभा मतदार संघातील अपक्ष उमेदवार डॉ.मधु राजेश मानवतकर यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन आज (दि.९) शहरातील जामनेर रोडवरील अष्टभुजा मंदिरासमोर डॉ.वसंत चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले.

 

येथील माजी आमदार संतोष चौधरी यांनी डॉ.मधु मानवतकर यांना पाठिंबा दिल्याने बड्या पक्षांच्या उमेदवारांसमोर अपक्ष उमेदवाराचे मोठे आव्हान येथे पाहायला मिळणार आहे. त्यामुळे येथील लढत राष्ट्रीय पक्ष विरुद्ध अपक्ष अशी रंगणार आहे. पहिल्यांदाच भुसावळ मतदार संघात वैद्यकीय क्षेत्रातील व्यक्ती निवडणूक लढत असल्याने भुसावळातील अनेक डॉक्टरांनी अपक्ष उमेदवार डॉ. मधु मानवतकर यांना पाठिंबा दिला आहे.

डॉ. मानवतकर यांच्या प्रचार कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी माजी आमदार संतोष चौधरी यांच्यासह माजी नगराध्यक्ष उमेश नेमाडे, डॉ.वसंत चौधरी भुसावळातील अनेक नामांकित डॉक्टर्स, नगरसेवक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

Exit mobile version