Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

मामलदे येथे नालाखोलीकरण कामांचे उद्घाटन व पाहणी

WhatsApp Image 2019 06 30 at 2.02.32 PM

चोपडा (प्रतिनिधी): तालुक्यातील मामलदे येथे ज्येष्ठ नेते अरूणभाई गुजराथी यांचा वाढदिवसानिमित्त शनिवार २९ जून रोजी चोपडा पिपल्स को.ऑप.बॅक सार्वजनिक सेवा ट्रस्ट व भारतीय जैन संघटना ,मामलदे ग्रामस्थ यांच्या लोकसहभागातून पाणी आडवा पाणी जिरवा अंतर्गत मामलदे येथे नालाखोलीकरण कामाचा शुभारंभ करण्यात आला.

प्रा.अरूणभाई गुजराथी, यांच्या हस्ते नारळ वाढवून नालाखोलीकरण कामाचे उदघाटन करण्यात आले. दोन दिवसांपूर्वीच प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यात आली होती त्याकामाचे पाहणी केली. याप्रसंगी मामलदे येथील ग्रामस्थ पिपल्स बँक सार्वजनिक सेवा ट्रस्टचे चंद्रहासभाई गुजराथी,उपाध्यक्ष मोरेश्वर देसाई, सुभाषभाई गुजराथी, भारतीय जैन संघटनेचे विभागीय जनसंपर्क प्रमुख लतीश जैन, तालुका अध्यक्ष क्षितिज चोरडीया आदी हजर होते. मान्यवरांचे मामलदे ग्रामस्थांच्यावतीने सत्कार करण्यात आला. यावेळी मान्यवरांनी कामाची पाहणी करून मामलदेवासीयांचा कौतुक केले.

Exit mobile version