Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

आजच्या युगात विद्यार्थ्यांना संगणकाचीच नितांत गरज : डॉ. केतकी पाटील

रावेर – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । आजच्या जगात शिक्षणासाठी संगणकाची नितांत गरज आहे. त्याशिवाय शिक्षण घेणे शक्य नसून विद्यार्थ्यांना संगणकाची गरज आहे. यासाठी आमदार डॉ.तांबे यांच्या निधीतून शाळांना संगणक वाटप करित असल्याचे प्रतिपादन डॉ. केतकी पाटील यांनी केले. ते विवरे येथील कार्यक्रमात बोलत होत्या.

नाशिक विभाग पदविधर मतदार संघाचे आमदार डॉ.सुधीर तांबे यांच्या स्थानिक विकास निधीतुन रावेर तालुक्यातील ११ शाळांना ११ संगणकाचे वाटप करण्यात आले. विवरे बेंडाळे हायस्कूलमध्ये आयोजितक कार्यक्रमात अध्यक्षस्थानी डॉ. केतकी पाटील उपस्थीत होत्या. याप्रसंगी विवरे येथील श्री. ग. गो. बेंडाळे हायस्कूल येथे झालेल्या संगणक वाटप कार्यक्रमाला गोदावरी फाऊंडेशनच्या प्रेरणास्त्रोत गोदावरी आई पाटील, सदस्या डॉ.केतकी पाटील, रावेर नगराध्यक्ष दारा मोहम्मद, महाराष्ट्र राज्य माध्यमिक मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष जे के पाटील, रावेर शिक्षण संवर्धन संघाचे चेअरमन प्रा.प्रकाश मुजुमदार, विवरे हायस्कूल चेअरमन धनजी लढे, सचिव शैलेश राणे, माजी ग स संचालिका कल्पना पाटील, दिलीप पाटील, माजी सरपंच वासुदेव नरवाडे, नारायण घोडके, रोझोदा हायस्कूलचे सचिव डॉ. मनिष फेगडे, रमेश पाचपांडे, वसंत राणे, केशव राणे, मनोहर राणे, मुख्याध्यापिका हर्षाली बेंडाळे, कमलाबाई गर्ल्स हायस्कूल प्राचार्या संध्या कानडे, पर्यवेक्षिका जयश्री पुराणिक, वाय एल पाटील, विनायक तायडे, अ‍ॅड.इमाम तडवी, राकेश मोरे, जितेंद्र पाटील, सुनिल महाजन यासह चेअरमन, व्हाईस चेअरमन, संचालक, शिक्षक बहुसंख्येने उपस्थित होते. सुत्रसंचलन शैलेश राणे यांनी तर आभार प्रा.विनोद पाटील यांनी आभार मानले.

११ शाळांना संगणक वाटप 

जावळे माध्यमिक विद्यालय कुसुंबा, जि प प्रथमिक शाळा कुसुंबा, जि प मराठी शाळा निंबोल, अँग्लो उर्दू हायस्कूल रावेर, अलहसनात उर्दू हायस्कूल रसलपुर, जि प मराठी शाळा मोरगाव खुर्द, ना गो पाटील विद्यालय उदळी, विकास माध्यमिक विद्यालय खिरवड, के. एस. अगरवाल हायस्कूल रावेर, प्रगति विद्यालय रोझोदा, चिनावल हायस्कूल या ११ शाळांना संगणक वाटप करण्यात आले.

 

Exit mobile version