Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

सोलापूर येथे झालेल्या राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेत डॉ. जगदीश पाटील सी बी एस ई शाळेचे घवघवीत यश

मुक्ताईनगर- लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | स्टेअर्स फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य अंतर्गत राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा २०२३-२४ या मध्ये उपविजेतेपद पटकावणाऱ्या 14 वर्षाखालील आणि 17 वर्षाखालील संघाचे आणि क्रीडा शिक्षकांचे शाळेचे अध्यक्ष व संस्थापक डॉ. जगदीश पाटील सर आणि मुख्याध्यापक डॉ. योगेश सोनवणे सर यांच्या हस्ते अभिनंदन करण्यात आले.

ही स्पर्धा दिनांक ०१,०२ & ०३ डिसेंबर २०२३ दरम्यान सिंहगड इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूट, सोलापूर येथे आयोजित करण्यात आलेली होती. यासाठी मुलांना शाळेचे संस्थापक आणि अध्यक्ष डॉ. जगदीश पाटील सर, संचालक डॉ. मधुश्री पाटील मॅडम, मुख्याध्यापक डॉ. योगेश सोनावणे सर, क्रीडा शिक्षक शेख मुबीन सर यांचे अनमोल सहकार्य लाभले. या स्पर्धेमध्ये 14 वर्षाखालील गटामध्ये ईशान झांबरे, आरूष पटेल, क्रिश पाटील, समर्थ दुट्टे, साहील सुरडकर, तसेच 17 वर्षाखालील गटामध्ये तोषण गोहर, आर्यन सुरडकर, शिवराज देशमुख, स्वरूप पाटील या विद्यार्थ्यांचा समावेश होता.

Exit mobile version