Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

मध्यरात्री हॉटेल फोडून २५ हजारांचा मुद्देमाल लांबविला; अमळनेर पोलीसात गुन्हा दाखल

अमळनेर लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । शहरातील भाजीपाला मार्केटमधील हॉटेल मधील किचनचा पत्रा कापून दुकानातून विदेशी दारूच्या बाटल्या रोकड आणि सिगारेटचे पाकीट असा एकूण २५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल अज्ञात चोरट्याने चोरून नेला. याप्रकरणी शनिवारी १५ जुलै रोजी दुपारी ४ वाजता अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत माहिती अशी की, अमळनेर शहरातील भाजीपाला मार्केट परिसरात हॉटेल पायल आहे. या ठिकाणी या दुकानात सिगारेट विदेशी दारू ठेवलेल्या आहेत. दरम्यान १४ जुलै रात्री ११ ते १५ जुलै सकाळी १० वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्याने हॉटेलमधील किचन रूमचा छताचा लोखंडी पत्रा कटरने कापून आत प्रवेश करत सिगरेट पाकीट, विदेशी दारूच्या बाटल्या आणि रोकड असा एकूण २५ हजार रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी हॉटेल मॅनेजर चंदन नानेकराम चौक (वय-५०) रा. अमळनेर यांनी अमळनेर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार रामकृष्ण कुमावत करीत आहे.

Exit mobile version