Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

आंतर विभागीय धनुर्विद्या स्पर्धेत जळगाव विभाग प्रथम तर एरंडोल व्दितीय स्थानी

फैजपूर – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । येथील धनाजी नाना महाविद्यालयात ‘कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव’ अंतर्गत ‘आंतर विभागीय धनुर्विद्या स्पर्धा २०२१/२२ यशस्वीरित्या संपन्न झाली. स्पर्धेच्या अंतिम टप्प्यात पुरुष व महिला गटात जळगाव विभागाने प्रथम प्रथम क्रमांक पटकविला तर एरंडोल विभागाला व्दितीय स्थान प्राप्त झाले.

येथील धनाजी नाना महाविद्यालयात ‘कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव’ अंतर्गत ‘आंतर विभागीय धनुर्विद्या स्पर्धा २०२१/२२ यशस्वीरित्या संपन्न झाल्या. ‘आंतर विभागीय धनुर्विद्या स्पर्धे’साठी पुरुष गटात जळगाव व एरंडोल असे दोन विभागाचे पुरूष गट व महिला गट असे दोन्ही गटातून खेळाडूंनी सहभाग नोंदवला. स्पर्धेच्या अंतिम टप्प्यात पुरुष व महिला दोन्ही गटात जळगाव विभाग प्रथम बाजी मारली व एरंडोल विभागाला व्दितीय स्थान प्राप्त झाले.

स्पर्धेच्या उद्घाटन समारंभाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.पी.आर. चौधरी होते त्यांनी धनुर्विद्या खेळ व आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचे स्थान या विषयावर मार्गदर्शन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

जिमखाना समितीचे चेअरमन डॉ. सतिश चौधरी यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले व धनुर्विद्येचा प्राचीन काळापासून आतापर्यंतचा इतिहासाची माहिती सांगितली. या प्रसंगी उपप्राचार्य प्रा.अनिल सरोदे, प्रा.व्ही.सी. बोरोले, प्रा.डॉ.प्रतीभा ढाके,विद्यापीठ क्रीडा मंडळ सदस्य, प्रा.बी.बी.बारसे, प्रा.हर्ष सरदार, प्रा.डॉ.संजय भावसार, प्रा.डॉ.बेलोरकर, प्रा.सुभाष वानखेडे, प्रा.क्रांती क्षीरसागर प्रा.उमेश पाटील, प्रा.प्रसाद भोगे आदि उपस्थित होते, मुख्य पंच प्रा. मुकेश पवार व पंच म्हणून श्री रायमल भिलाला, निशांत राठोड, दिपके, यांनी काम पाहिले.

स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी प्रा.डॉ.मुकेश पवार, प्रा.सुभाष वानखेडे, प्रा.क्रांती क्षीरसागर, प्रा.उमेश पाटील, आर.डी ठाकूर आदींनी सहकार्य केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शारीरिक शिक्षण संचालक डॉ.गोविंद मारतळे यांनी केले व आभार शिवाजी मगर यांनी मानले.

 

Exit mobile version