Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

यावल महाविद्यालयात शिवराज्याभिषेक दिन उत्साहात

यावल – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । येथील कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात इतिहास व विद्यार्थी विकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने  छत्रपती शिवाजी महाराज यांचा शिवराज्याभिषेक दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

महाविद्यालयाच्या दालनात आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. ए. पी. पाटील होते तर प्रमुख वक्ते म्हणुन महाविद्यालयाच्या इतिहास विभागाचे प्रमुख डॉ. अनिल पाटील यांनी रयतेचा राजा हिंदवी स्वराज्य संस्थेचे जनक छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याला उजाळा देऊन राज्यभिषेकाचे महत्व, कारणे, परिणाम यांचे महत्वपूर्ण विवेचन केले.

या संपुर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. नरेंद्र पाटील यांनी केले तर या शिवराज्यअभिषेक कार्यक्रमास उपस्थितांचे आभार मिलिंद बोरघडे यांनी मानले. सदरील कार्यक्रमाला उपप्राचार्य प्रा. एम. डी. खैरनार, संतोष ठाकूर, डी. डी. पाटील, प्रमोद भोईटे, अनिल पाटील, तसेच प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी प्रामुख्याने उपस्थित होते.

 

Exit mobile version